अनेकदा दुकानदार तुम्हाला अति ताकदवान लॅपटॉप उद्या लागेल म्हणून विकतो , वस्तूत: तितकी ताकद कधीही लागत नाही, ताकदवान प्रोसेसर हे महाग असतात आणि त्याचे दुकानदाराला अधिक फायदा मिळतो.आज लॅपटॉप अतिशय मागणी आल्याने आणि चीन मधून पुरवठा बराच कमी झाल्याने लॅपटॉप च्या किमती – नवीन आणि जुन्या फार वाढल्या आहेत. आता मार्केट खराब असल्याने पैसे वाचवणे ही गरज झाली आहे.
तसेच इंटेलचे आय सिरीजच्या जुन्या प्रोसेसरचे लॅपटॉपहि आय सिरीजचे आहेत म्हणून विकले जातात. यातील काही फार जुने असतात. थर्ड जनरेशनच्या आय ३ प्रोसेसर हे २०१२ ला लाँच झाले होते आणि २०१४ पर्यंत विकत होते फार फार तर २०१५ पर्यंत – म्हणजे हे ५ वर्षे जुने लॅपटॉप आहेत. बरेच नवीन पेंटियम हे सेकण्ड / थर्ड जनरेशन च्या आय ३ आणि काही आय ५ पेक्षा पॉवरफुल आहेत – आणि जर बेसिक काम असेल तर पुरेसे आहेत. आज आपण या बद्दल माहिती घेऊ यात.
आपली गरज आणि लॅपटॉप
१) इंटरनेट ब्राउजिंग – फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही. यात बरेच टॅब उघडून ठेवायची सवय असेल तर गुगल क्रोम वापरू नका .- त्याऐवजी ऑपेरा / ब्रेव्ह / इज असे ब्राउसर वापरून पहा – फायरफॉक्स – पूर्वी चांगला होता – आता तोहि लोड देतोय असे दिसले आहे .
२) व्हिडीओ कॉल – झूम वगैरे – याला हि फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
३) मायक्रोसॉफ्ट ऑफिस -वर्ड, एक्सेल फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही पॉवर पॉइंट वापरायचा थोडी जास्त , पण काम चालून जाते ४) व्हिडिओ बघणे ( व्हीलसी वगैरे)
५) गाणी ऐकणे : साठी फार प्रोसेसिंग पॉवर लागत नाही
बरीच सॉफ्टवेअर पण कमी प्रोसेसिंग पॉवरवर चालतात. अनेक प्रोग्रामिंगच्या युटीलिटी ही कमी प्रोसेसिंग पॉवरवर सहज चालतात. त्याचबरोबर ऑनलाइन टीव्ही आपणास ब्राऊसर मध्ये बघता येईल.
आय ३ प्रोसेसर :
वरील सर्वांसाठी आय ३ हा प्रोसेसर फार जास्त होईल आणि आता किमती ही वाढल्या आहेत. इंटेलने पेंटियम हे तुलनेने स्वस्त प्रोसेसर काढले आहेत –
पेंटिअम मध्येहि गोल्ड सिल्व्हर आणि क्वाड कोअर आहेत ( quad core – 4 cores) तसेच एएमडी या कंपनीचे अनेक स्वस्त प्रोसेसर आहेत यात AMD A6 / A8 / A9 / A10 चा पर्याय ठिक राहील.
रॅम आणि स्क्रीन :
लॅपटॉप फार बाहेर नेण्याची गरज नसेल तर आपण १५. ५ इंची स्क्रीन चा घ्या – हे तुलनेने स्वस्त आणि जड असतात – पण स्क्रीन तुलनेत मोठी असते. सिनिअर सिटीझन / विद्यार्थी साठी चांगले.
रॅम हे कमीत कमी ४ जीबी – शक्यतो ८ जीबी घ्या – रॅम हे डीडीआर ४ प्रकारचेच घ्या. डीडीआर ३ रॅम जुने तंत्रज्ञान आहे आणि ते स्लो असते.
हार्ड डिस्क :
हार्ड डिस्क शक्यतो एसएसडी प्रकारची घ्या – तिने चांगला स्पीड मिळतो. पण जर साधी हार्ड डिस्क असेल तर आपणास सहज एसएसडी हार्ड डिस्क टाकू शकतो – साधारण २४० जीबी एसएसडी अडीच तीन हजारात यावी आणि विकत जिकडून घेता तिकडेच आपणास बदलून मिळेल.
बेसिक लॅपटॉपसाठी सुचवलेले स्पेसिफिकेशन :
१. Processor – Intel Pentium or AMD A4/A6/A8/A9/A10*
* याहून ही स्वस्त आणि स्लो प्रोसेसर आले होते पण आता ते मला तरी मार्केट मध्ये दिसले नाहीत – खरे तर ते ही चालून जावेत – हे प्रोसेसर म्हणजे Intel Atom Intel Celeron, Amd Sempron (mostly discontinued)
२. Ram – 8GB DDR 4**
**बऱ्याचदा लॅपटॉप मध्ये ४ जीबी रॅम असते – तर अनेक लॅपटॉप मध्ये हे रॅम वाढवता येते – फक्त एक रॅमचा स्लॉट खाली आहे आणि किती रॅम वाढवता येईल त्याची चौकशी करा. तो दुकानदार रॅम वाढवून देतोय का ते विचारा.
३. Hard Disk – Preferred SSD or 1 TB of hard disk***
Screen – 15.5 Inch
*हार्ड डिस्क च्या जागी SSD टाकता येते – आणि त्याने स्पीड वाढतो.
आता वेगळ्या आकाराच्या वेगळा कनेक्टर असलेला आणि अधिक फास्ट अशा M. 2 हार्ड डिस्क आल्या आहेत, आणि त्यातहि २ प्रकार आहेत
m.2 SATA
m.2 NVME – हि सर्व प्रकारात फास्ट आहे.
आपल्या लॅपटॉप ला कोणता m.2 स्लॉट आहे ते बघा आणि हा असेल तर नेहमीची हार्ड डिस्क ठेवूनहि अजून एक लावतात येते – ऑपरेटिंग सिस्टीम व सर्व महत्त्वाचे प्रोग्राम हिच्यावर घ्यावे .
हे बदलणे हे काहीवेळा कौशल्याचे होऊ शकते – त्यामुळे ते विचारून , योग्य ते पार्ट आणून सर्व्हिस सेंटर मधून करून घ्यावे आणि त्याबरोबर वॉरंटी वर काही परिणाम होणार नाही का हे पण विचारावे. आता रॅम / हार्ड डिस्क बदलणे साठी लॅपटॉप उघडावा लागतो
अधिक ची वॉरंटी –
अनेकदा लॅपटॉप अधिकची वॉरंटी विकतात – नॉर्मल वॉरंटी वर बहुतेक वेळा २ वर्षे वाढवून मिळतात – यात बॅटरी आणि अडाप्टर सोडून सर्व कव्हर होते – तरी तर हि वॉरंटी घ्यावी. अनेकदा कंपनीच्या स्कीम असतात आणि वॉरंटी स्वस्तात वाढवून मिळते.