Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

स्वरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त सांगितीक मैफल

चिरतरुण आवाज आणि तेवढाच सळसळता उत्साह याने रसिक प्रेक्षकांना कैक वर्ष भारावून टाकणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले येत्या 8 सप्टेंबरला 87 व्या वर्षात पदार्पण करतायत.

आशाताई गेली तब्बल सहा दशकं भारतीय संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं आणि अढळ स्थान राखून आहेत. त्यामुळे आशाताईंच्या या आगामी वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यांच्या या योगदानाला साजेशा पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज पुढे सरसावलीये. झी टॉकीजने आशाताईंच्या या खास दिनाचं औचित्य साधत तब्बल तीन तासाच्या सांगितमय मैफिलीचे आयोजन केलेय.

भारतीय शास्त्रीय संगीत, रविंद्र संगीत, कव्वाली, लोकसंगीत याबरोबरच आशाताईंनी स्वरबद्ध केलेल्या गाजलेल्या चित्रपटगीतांचा आस्वाद या मैफीलीमधून प्रेक्षकांना घेता येईल. आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैश्यंपायन सारखे युवा गायक तर उर्मिला मातोंडकर, राधिका आपटे, भुमी पेडणेकर सारखे बॉलीवूडमधले नामांकीत चेहरे या मैफिलीमध्य़े परफॉर्म करणार आहेत.

येत्या रविवारी म्हणजे सहा सप्टेंबरला झी टॉकीजवर रात्री नऊ वाजता हा सांगितीक सोहळा पहायला मिळणारे.

Exit mobile version