हल्लीचे जीवन धकाधकीचे झाले आहे आणि त्याचा आपल्या आरोग्यावर आपल्याही नकळत परिणाम होतो. बॉसशी भांडण होत पण त्याचा राग बायकोवर , मुलांवर काढला जातो. गर्लफ्रेंडशी वाद झाला सगळं संताप आईवर. अभ्यास पूर्ण नाही झाला की हक्काच्या मित्रांवर, मैत्रिणींवर संताप. का ? कोणासाठी ? कशासाठी ? कधी विचार केला का असे का होते ?
अशी लक्षणे दिसतात का तुमच्यात…
अगदीच शुल्लक कारणावरून रागावणे. अस्वस्थ होणे .जास्तच खाणे किंवा अजिबात न खाणे. चहा , कॉफी ,मद्यपान ,धूम्रपान अति करणे. निर्णय क्षमता कमी होणे . डोकेदुखी , अपचन, आम्लपित्त, मानदुखी, त्वचारोग, हृदयाची धडधड वाढणे, दात चावणे. इ. उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब , जास्तच थकवा येणे.
ही सगळी ताणतणावाची लक्षणे आहेत. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी कमी होत जाते . हार्टअॅटॅकचे प्रमाण वाढते. लैंगिक समस्या निर्माण होणे. सोरायसिस ( Psoriasis ) सारखे त्वचाविकार होणे.पुरुषांना अल्सर व हृदयरोग होतात. तर स्त्रियांना अस्वस्थता व नैराश्य येते .
पण यावरही उपाय आहेत…
१. प्रत्येक विचार सकारात्मकच करा. दुःखी होण्यापेक्षा आनंदी विचार करण्याची सवय लावा. शाकाहारी राहून पौष्टिक व सात्विक आहार घ्या. गरजेपेक्षा जास्त खाऊ नका, नाहीतर शारीरिक व बौद्धिक थकवा लवकर येईल.
२. एकच काम, एकाच जागी बसून जास्त वेळ न करता, वेगवेगळी कामे करा. सामाजिक संबंध वाढवा, त्यासाठी नातेवाईक ,शेजारधर्म व मित्रमैत्रिणी जोडा. करमणूकीकरीता छंद जोपासणे. विश्रांती घ्या. ध्यानधारणा थोडावेळ तरी करा. खूप टेन्शन आले तर भरपूर रडून मोकळे व्हा किंवा मनमोकळेपणाने हसा. टेन्शन नक्कीच कमी होणार.
३. व्यसने केल्याने टेन्शन कमी होत नाही हे लक्षात घ्या. हं पण टेन्शन सहन करण्याची क्षमता नष्ट होते. नियमित प्राणायाम, योगासने, सूर्यनमस्कार इ. करा. टेन्शन आल्यास हातापायांचे तळवे घासा व प्रेस करा. चिंतामुक्त आयुष्याचा ध्यास घ्या