अनेक लोक अजूनही पुनर्जन्मावर विश्वास ठेवतात. त्यांचा असा विश्वास असतो की मृत्यूनंतर, मनुष्य पृथ्वीवर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुन्हा जन्म घेतो. कंबोडियातील एका महिलेलाही असेच वाटले. पण एवढ्यावर ती थांबली नाही, तर तिने चक्क गायीशी लग्न केले आहे. महिलेचा असा विश्वास आहे की तिच्या दिवंगत पतीने गायीच्या रूपात पुनर्जन्म घेतलाय.
या अनोख्या लग्नामुळे कंबोडियातील क्राती प्रांतात राहणारी 74 वर्षीय महिला आपल्या परिसरात प्रसिद्ध झाली आहे. खिम हँग असे तीचे नाव आहे. हे लग्न आता प्रसिद्धीच्या झोतात आहे. महिलेच्या कृतीबद्दल लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याच वेळी, महिलेचा असा विश्वास आहे की गायीची सर्व वैशिष्ट्ये तिच्या मृत पतीसारखी आहेत.
रिपोर्ट्सनुसार, गायीचा जन्म झाला तेव्हा ती महिलेसोबत बराच वेळ घालवत असे. ही गाय त्या महिलेचा हात आणि चेहरा चाटायची. अनेकवेळा ती महिलेच्या चेहऱ्यावर चुंबन घेत असे. या महिलेचा असा विश्वास होता की तिच्या पतीप्रमाणेच गाय तिच्यावर प्रेम करते. गायीचे स्वतःबद्दलचे प्रेम पाहून खिम हांगला समजले की गायीच्या रूपात परत आलेला तिचा पतीच आहे.
खरी गंमत तर पुढेच आहे. आता त्या बाईच्या मुलांचाही असा विश्वास आहे की त्यांच्या वडिलांनी गाय म्हणून जन्म घेतला आहे. त्यामुळे ते गायीचीही खूप सेवा करतात. त्यांच्या घरात गाय एकत्र राहते. एवढेच नाही तर महिलेने गाईला तिच्या खोलीत ठेवलेली तिच्या पतीची उशी दिली आहे.
यासोबतच महिलेने मुलांना सांगितले आहे की, तिच्या मृत्यूनंतर त्यांनी गायीवर वडिलांप्रमाणे प्रेम करावे. गाय विकून त्यांना चांगले चारा देऊ नका. याशिवाय गाय मेली की माणसाप्रमाणे तिचा अंत्यसंस्कारही करावा.