उत्तम आरोग्यासाठी उपवास करायला हवा

धार्मिक कारणासोबतच उपवास करण्याचे काही आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

डीटॉक्सिफिकेशन

आयुर्वेदानुसारही अनेक आजारांचं मूळ हे शरीरात साचून राहणारे विषारी घटक हे आहे. त्यामुळे उपवासानेे पोटाला आराम मिळतो आणि घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते.

पचनसंस्थेचे कार्य सुधारते

उपवास केल्यास पचनकार्यालाही चालना मिळते. पचनसंस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते.

मन शांत होते

मानसिक ताणतणाव वाढला की चिडचिड, मत्सर यासारख्या भावनाही वाढतात. उपवास केल्याने पोटात अ‍ॅसिड बिल्डअप वाढतो. त्यामुळे अनेक अनेक समस्यांवर नियंत्रण ठेवणं सुकर होते.

उर्जा मिळते 

शरीर आणि मन डिटॉक्स ाल्यानंतर त्यामधून शरीरालाही उर्जा मिळते. अधिक प्रसन्न आणि रिफ्रेशिंग वाटते.

उपवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ?
उपवास करताना आहाराचं, व्यायामाचं आणि आरोग्याचं गणित सांभाळा. खूप थकवणारे व्यायाम, कामं टाळा. खूप तेलकट किंवा सतत खातं राहणं टाळा. त्याऐवजी राजगिरा थालिपीठ, फळं असा हलका आहार घ्या. यामुळे पचनकार्यावर भार येणार नाही. खाण्यासोबतच मुबलक पाणी किंवा लस्सी, ताक यासारखे पेययुक्त पदार्थ आहारात ठेवा.