Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतकरी मित्रांनो, हे सात मंत्र करतील तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत

शेतकरी मित्रांनो, लोक यशस्वी आणि श्रीमंत होतात कसे? असा प्रश्न मोठमोठ्या लोकांना पाहिल्यावर कुणालाही पडतो.  या लोकांना यशस्वी करणारे हे उपाय तुम्हीही अवश्य करून पाहा…

सकाळी लवकर उठा

ही सवय सर्वच यशस्वी लोकांमध्ये दिसून येते. ओबामा, टीम कुक हे सर्व सकाळी लवकर उठतात. जे लवकर लवकर उठतात ते स्वतःच्या आणि नियोजनासाठी, इतरांच्या तुलनेत खूप वेळ देतात.

आठवड्यात ८० ते १०० तास काम

यशस्वी लोक स्वत:ला नेहमी कामांमध्ये व्यग्र ठेवतात. आठवड्यातून 80 ते 100 तास काम करून लोक यशस्वी झाले आहेत.

वाचनाचे महत्त्व

कोणत्याही व्यवसायासाठी वाचन खूप महत्वाचे आहे. वाचनाने माहिती वाढते. वाचन हा स्वत: ला सुधारविण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याकडे पैसे कमी होते. पण तरीही त्यांनी खूप वाचन केले. खूप माहिती मिळविली, ज्ञान वाढविले.

झोपण्यापूर्वी करा दुसऱ्या दिवसाचेही नियोजन

रात्री झोपण्यापूर्वी दुस-या दिवशीच्या नियोजनाची तयारी करा. दुस-या दिवशीच्या सर्व कामांची यादी बनवून त्यानुसार काम केले, तर उत्पादकता वाढते.

पैशांची बचत

श्रीमंत होण्याचा सर्वात अचूक मार्ग म्हणजे पैशाची बचत करणे. आज जे कोणी श्रीमंत आहेत त्यांनी एकेकाळी खूप जपून आणि विचारपूर्वक पैसे खर्च केले होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिवंगत उद्योगपती धीरुभाई अंबानी.

माणसे जोडा; नेटवर्किंग वाढवा

यशस्वी लोक नेटवर्किंगचे महत्त्व उत्तम जाणतात. नेटवर्किंग म्हणजे लोकांच्या संपर्कात राहणे. अधिक लोकांना आपल्याशी जोडणे. त्यामुळे यशस्वी लोकांना दुसऱ्यांकडूनही भरपूर मदत मिळते.

सदवर्तन आणि मेहनत

नियोजनपूर्वक प्रयत्न, चिकाटी, लोकांशी विनम्र आणि चांगले वर्तन, यशस्वी लोकांच्या अंगी असल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version