धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे यंदा अनेकांना फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार पुढे ढकलण्याचा विचार अजिबात करू नका. हा फायदा दुहेरी होऊ शकतो असे या क्षेत्रातील जाणकार असलेल्या मोतीलाल ओसवाल या कंपनीने वर्तविले आहे. पहिला फायदा हा कि आता सोन्याच्या किंमती आपल्या आवाक्यात असू शकणार आहेत. दुसरा फायदा हा की येणाºया दिवाळीपर्यंत सोन्याचा बाजार चढता राहणार असल्याने सोन्याची आज खरेदी केलेल्या सोन्याची किंमत वाढून ती 53 हजार रूपये प्रति दहा ग्रॅम अशीही असू शकते. त्यामुळे आताची बचत ही भविष्यातील गुंतवणूकीतील फायदा करून देणारी ठरणार आहे. अर्थात या किंमती खरंच वाढणार का? त्यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता नक्कीच आम्ही समजू शकतो.
तर या मागे मुख्य कारण हे आहे की कोरोनानंतरच्या लॉकडाऊननंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून त्यातून सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढणार आहे. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत सोन्याचा भाव दोन हजार डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचे या क्षेत्रातले जाणकार सांगत आहेत. त्यामुळे आगामी वर्षभरात 52 हजार ते 53 हजार या दरम्यान प्रति दहा ग्रॅम असे सोन्याचे दर जाऊ शकतात.
2019 आणि 2020 मध्ये सोन्याच्या भावात वृद्धी होत होती. परंतु नंतर आलेल्या कोरोना महासाथीने सोने खरेदीवर चांगलाच परिणाम झाला आणि ते 47 ते 49 हजार प्रति दहा ग्रॅम इथपर्यंत घसरले. कोरोना प्रतिबंध हटविल्यानंतर बाजारपेठेत चैतन्य आले आणि सोने खरेदीकडेही कल वाढू लागला. परिणामी सोन्याचे भाव आता कायमस्वरूपी वाढते राहणार असून आता ज्या किंमती आहेत, त्या भविष्यातील किंमतींच्या तुलनेत कमी राहणार आहेत. म्हणूनच ही सोने खरेदीची सुवर्ण संधी असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत.