जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे. लोक कितीही संधीसाधू झाले असतील, पण प्रामाणिक आणि उपकार लक्षात ठेवणारी आजही जगात आहेत. अमेरिकेतून परतलेल्या अनिवासी भारतीयाच्या मुलांनी मात्र हे सिद्ध केले आहे. त्यांनी 12 वर्षांपूर्वी उधरीवर घेतलेल्या शेंगांचे पैसे पुढाकार घेऊन प्रामाणिकपणे अनेक पटींनी परत केले. हा प्रामाणिकपणा आणि माणुसकीची ही बाब सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय घडले होते १२ वर्षांपूर्वी…
हे प्रकरण 2010 चे आहे जेव्हा मोहन नावाचा अनिवासी भारतीय त्याच्या दोन मुलांसह आंध्र प्रदेशातील कोठावल्ली बीचला भेट देण्यासाठी आला होता. मुलांच्या विनंतीवरून त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर 25 रुपये किमतीच्या शेंगा विकत घेतल्या. मात्र तो पाकीट हॉटेलमध्येच विसरला होता. त्याच्याकडे विक्रेत्याला देण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा सतय्या नावाच्या या विक्रेत्याने औदार्य दाखवून शेंगा तशाच घेण्यास सांगितले. मात्र मोहनने ही उधारी असल्याचे सांगून सतीयाचा फोटोही काढला.
त्यानंतर मोहन मुलांसह अमेरिकेला परतला. 11 वर्षानंतर, मोहनची मुले प्रणव आणि शुचिता पुन्हा भारतात आले आणि त्यांनी त्या विक्रेत्याचा शोध घेतला. कारण त्यांना त्याचे कर्ज फेडायचे होते. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी शहरातील आमदाराची मदत घेतली, त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी काढलेला सतीयाचा फोटो टाकून लोकांना मदत करण्यास सांगितले.
त्यानंतर मात्र त्यांना सतीयाचं घर सापडलं. खेदाची गोष्ट म्हणजे सतीया या जगात आता हयात नव्हता. पण त्याच्या कुटुंबाला मात्र त्याच्या उधारीचे सर्व पैसे पूर्ण व्याजासह मिळाले.
होय, मोहनच्या मुलाने 12 वर्षांपूर्वी कर्जाच्या 25 रुपयांच्या बदल्यात संपूर्ण 25 हजार रुपये सताय्यांच्या कुटुंबाला दिले. सतीयाच्या औदार्य आणि मोहनच्या प्रामाणिकपणाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.