शाकाहारी आहात? हे आहेत तुमच्यासाठी प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत!

स्नायू तयार करण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रथिने हे सर्वात आवश्यक पोषक तत्वांपैकी एक आहे. व्यायामशाळेत जाणारे लोक आपली प्रथिनांची रोजची गरज विविध पदार्थ खाऊन पूर्ण करतात. अंडी हे प्रथिनांसाठी सर्वात योग्य अन्न मानले जाते, पण अंडेही न खाणाऱ्या शाकाहारी लोकांना नेहमीच प्रथिनांच्या पर्यायांची कमतरता भासते. तुम्ही शाकाहारी असाल, तर तुम्हालाही शाकाहारी पदार्थांमधून उत्तम प्रथिने मिळू शकतात.
पनीर हा तर प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहेच पण त्याही व्यतिरिक्त आणखी तीन चांगले स्त्रोत आहेत, तुम्हाला ते माहिती आहेत का?

छोले हा भारतातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. छोले हे प्रथिनांचे उत्तम स्रोत मानले जातात. सुमारे १०० ग्रॅम चणे किंवा छोले खाल्ल्यास १९ ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. याचे सेवन विशेषतः शाकाहारी लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

दह्याच्या तुलनेत ग्रीक योगर्टमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यात प्रथिने तसेच प्रोबायोटिक्स भरपूर असतात, ते पोटासाठी देखील फायदेशीर मानले जातात. प्रोबायोटिक्स आतड्यांमधील निरोगी जिवाणू वाढवण्यास मदत करतात.

सोयाबीन हाही प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. एक कप सोयाबीनमधून २९ ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. टोफू आणि सोया दूध यांसारखी सोयाबीन उत्पादने देखील शाकाहारी लोकांसाठी चांगले स्त्रोत असू शकतात. शाकाहारी लोक त्यांच्या दैनंदिन गरजा या पदार्थांद्वारे कमी पैशात सहज पूर्ण करू शकतात.