आयडिया-व्होडाफोनमध्ये अॅमेझाॅनची गुंतवणूक?

अडचणीत सापडलेल्या व्होडाफोन आयडियासाठी दिलासादायक  बातमी आहे. अॅडमेझॉन डॉट कॉम आणि व्हेरिजॉन कम्युनिकेशन्स व्होडाफोन आयडियामध्ये 29 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतात. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अॅपडजस्ट ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) प्रकरणात दिलेला आदेश लक्षात घेतला, तर ही गुंतवणूक फायद्याची ठरेल.

यापूर्वीया दोन्ही कंपन्यांतील भांडवल गुंतवणूक करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता दहा वर्षांत एजीआर भरण्याची मुदत दिल्याने आणि भांडवली गुंतवणूक करण्यास मान्यता दिल्याने आयडिया-व्होडाफोनने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

ई-कॉमर्स दिग्गज अॅयमेझॉन.इन आणि वेरिझन कम्युनिकेशन्स भारतात दूरसंचार कंपनी व्होडाफोन- आयडिया कंपनीचा काही हिस्सा खरेदी करू शकतात. व्होडाफोन- आयडियामध्ये दोन्ही कंपन्या सुमारे 29 हजार कोटींची गुंतवणूक करू शकतात. कंपनीवा एजीआरचे थकीत 50,440 कोटी रुपये भरायचे आहेत. कंपनीने आतापर्यंत सात हजार 854 कोटी रुपये भरले आहेत.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एजीआर प्रकरणाची सुनावणी करताना दूरसंचार कंपन्यांना एजीआर थकबाकी भरण्यासाठी दहा वर्षांची मुदत दिली. दूरसंचार कंपन्यांवरील एकूण थकीत रक्कम एक लाख चार हजार कोटी रुपये आहे. आता कंपन्यांना 31 मार्च 2021 पर्यंत दहा टक्के एजीआर थकबाकी भरावी लागेल. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की न्यायालयाने प्रस्तावित पेमेंट पॅटर्न इतर कंपन्यांच्या तुलनेत व्होडाफोन आयडियासाठी अडचणी वाढवेल. त्यामुळे कंपनीच्या रोख प्रवाहावर दबाव निर्माण होईल.