Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

आलिया भट सीतेच्या रूपात दिसणार

अभिनेत्री आलिया भट यांच्या जन्मदिनानिमित्त दिग्दर्शक एस.एस .राजामौली यांच्या  बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी  आरआरआर चित्रपटातील  आलिया भट यांची  सीताच्या  रूपातील  नवीन झलक सोमवारी सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आली.

यासंदर्भात  ट्वीटरद्वारे एस एस राजमौली  म्हणाले,  “दृढ इच्छाशक्ती आणि संक्लपाने परिपूर्ण सीतेसाठी  रामराजूची प्रतीक्षा मोठी अद्भुत  असणार
आहे.” आरआरआर मध्ये आलिया भट सीताची  भूमिका साकारत असून त्या अभिनेते राम चरण यांच्यासोबत दिसणार आहेत. आलिया भट  साठी आरआरआर तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम चित्रपट सृष्टीत थेट पदार्पण असणार आहे.

मागील वर्षी प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आणि देशव्यापी संचारबंदीनंतर  केंद्र आणि राज्य सरकरच्या सर्व आरोग्य विषयक  नियम आणि दिशानिर्देशांचे पालन करीत’ आरआरआर’ चित्रपटाचे चित्रीकरण  हैदराबाद- पुणे, गुजरात सह अन्य ठिकाणी घेण्यात आले. चित्रपट आता आता शेवटच्या टप्यात आला असून चित्रीकरण स्थळी सर्व प्रकारची काळजी घेत चित्रीकरण होत आहे.

‘आरआरआर’ चित्रपट 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.  या संदर्भात  ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त एस एस राजमौली  म्हणाले होते,  “जल आणि अग्नीच्या अजिंक्य शक्तीचे दर्शन 13 ऑक्टोबरला होणार.” बाहुबलीच्या वैश्विक यशानंतर आरआरआर दहा भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.’ आरआरआर ‘ अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम या महान क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित सत्य  घटनांवर एक काल्पनिक
चित्रपट आहे. “राईज .. रोअर .. रिवोल्ट … ” अशी चित्रपटाची संकल्पना आहे. चित्रपटात अभिनेते अजय देवगण, श्रिया सरण  आणि आलिया भट यांचा देखील समावेश आहे.

चित्रपटात अभिनेते  ज्युनियर एनटीआर कोमाराम भीम  यांची भूमिका साकारणार आहेत तर राम चरण अल्लुरी सीताराम राजूंच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात आंतर-राष्ट्रीय स्तराचे तंत्रज्ञ-कलाकारही  सहभागी झाले आहेत. अभिनेत्री ओलिव्हिया मॉरिस,  अॅिलिसन डूडी आणि रे स्टीव्हनसन राजामौली यांच्यासोबत काम करणार आहेत.चित्रपटात अभिनेते  ज्युनियर एनटीआर आणि राम चरण पहिल्यांदाच एकत्र आले असून बाहुबलीनंतर  दिग्दर्शक  एस एस राजामौली यांच्या आरआरआर  चित्रपटा कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version