ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्य राय बच्चन यांची कोरोना चाचणी नकारात्मक आल्याने आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचे पुत्र अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना मागे कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

अभिषेक बच्चन यांनी tweet करून ही माहिती दिली. दरम्यान अभिषेक आणि अमिताभ यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.