Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

आगा खान पॅलेस आणि कान्हेरी लेण्यांमध्ये 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन

आज  7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे येथील ऐतिहासिक आगा खान पॅलेस आणि मुंबईतील कान्हेरी लेण्यांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ही स्थळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत (एएसआय) राष्ट्रीय महत्त्व असलेली संरक्षित स्मारके आहेत. ती एएसआय, मुंबई मंडळाच्या अखत्यारीत आहेत.

  

या प्रसंगी, आगा खान पॅलेसमध्ये वीस सहभागींनी एएसआय मुंबई मंडळासह औरंगाबाद मंडळाचा अतिरिक्त प्रभार असलेले अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. मिलनकुमार चौले यांच्या उपस्थितीत योगासने केली. 45 मिनिटांच्या योग सत्रामध्ये सहभागी झालेल्यांमध्ये एएसआय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली योगासने केली. तसेच  नागपूर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य विभाग सांस्कृतिक केंद्रातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात पुण्यातील प्रवीण भट्ट आणि लेझीम समूहाने सादर केलेले लेझिम नृत्य यांचा समावेश होता. पुण्याच्या  एकेकेआय  मार्शल समूहाने  ‘शिवकालीन युद्ध कला’ नावाची मार्शल आर्ट सादर केली.

  

त्याचप्रमाणे मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात स्थित कान्हेरी लेण्यांमध्ये एएसआय मुंबई मंडळाचे अधिकारी व इतरांच्या उपस्थितीत 20 जणांनी योगासने केली. त्यानंतर संगीत नाटक अकादमीतर्फे शास्त्रीय नर्तक शर्वरी जमेनिस यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Exit mobile version