Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सोने झाले स्वस्त, चांदीचे भाव वाढले

जर आज दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी सोन्या-चांदीची नवीन किंमत जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे.
बुधवारी एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीत घसरण झाली, तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. सोन्याचा भाव आज 0.20 टक्क्यांनी घसरला असून त्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 47,816 रुपयांवर आला आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव 0.05 टक्क्यांनी वाढून 61,386 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

जाणून घ्या सोन्याची शुद्धता :
दागिने बनवण्यासाठी बहुतेक 22 कॅरेटचा वापर केला जातो. काही लोक 18 कॅरेट सोने देखील वापरतात. दागिन्यांवर कॅरेटनुसार हॉल मार्क बनवले जाते. 24 कॅरेट सोन्यावर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे.

घरबसल्या समजेल सोन्या-चांदीचे भाव :
उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत देशभर बदलते. तुम्ही तुमच्या शहरातील सोन्याची किंमत मोबाईलवर देखील पाहू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल. अशा प्रकारे तुम्हाला घरबसल्या सोन्याचा नवीन दर कळेल.

Exit mobile version