Ashadhi Ekadashi: आषाढीच्या उपवासासाठी रताळ्यांची काय भावाने विक्री झाली

आज आषाढी एकादशीनिमित्त पुणे बाजारसमितीत सुमारे १०० क्विंटल रताळ्यांची आवक झाली. कमीत कमी बाजारभाव ५ हजार रुपये तर जास्तीत जास्त बाजारभाव दहा हजार रुपये असा मिळाला. सरासरी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.
भुसावळ बाजारसमितीत मात्र रताळ्याला आज अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला. काल राज्यात रताळ्याचा सरासरी बाजारभाव प्रति क्विंटल सुमारे तीन ते पाच हजार रुपये इतका होता.
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/07/2024
भुसावळ लाल क्विंटल 1 2500 2500 2500
पुणे लोकल क्विंटल 101 5000 10000 7500
16/07/2024
जळगाव क्विंटल 130 4000 5000 4500
खेड-चाकण क्विंटल 40 4000 5000 4500
सातारा क्विंटल 1 2500 3000 2750
राहता क्विंटल 2 7000 7000 7000
नाशिक हायब्रीड क्विंटल 46 3000 5600 4500
पुणे लोकल क्विंटल 673 3500 6000 4750
पुणे-मोशी लोकल क्विंटल 71 5000 7000 6000
मुंबई लोकल क्विंटल 101 6000 8000 7000