Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कांदा निर्यातबंदी; राज्य सरकार केंद्राला पत्र पाठवणार

कांदा निर्यातबंदी  प्रकरणी राज्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये तीव्र संताप आहे.  दरम्यान या संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठविण्यात येईल तसेच पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आज झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत हा तातडीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान अनेक मंत्र्यांनी अशी बंदी घालणे चुकीचे असल्याचे काल स्पष्ट केले होते.

हे ही वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात आपले विचार मांडले. यावेळी प्रधान सचिव अनुप कुमार यांनी माहिती दिली की 2018-19 मध्ये 21.83 लक्ष मेट्रिक टन, 2019-20 मध्ये 18.50 लक्ष मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे सांगितले.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जेएनपीटीमध्ये सध्या 4 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. बांगला देश, नेपाळ सीमेवर 500 ट्रक्स थांबून आहेत.

Exit mobile version