राज्यातील प्रगतशील व इच्छूक शेतकरी, उद्योजक यांना निर्यातदार करण्यासाठी आयात- निर्यात परवाना व अपेडा नोंदणी यासाठी मार्गदर्शन
पणन मंडळाच्या निर्यात विभागामार्फत शेतकरी, उद्योजक यांनी निर्यातीमधे उतरावे यासाठी निर्यात विभागामार्फत उद्योजकता विकासाठी आयात-निर्यात परवाना व अपेडा मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुमारे सन 2003 पासून सुरू करण्यात आला आहे.
निर्यात सल्ला व सेवा सुधारीत दर – आयात निर्यात परवाना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ मार्गदर्शन करते. आयात निर्यात परवान्यासाठी पणन मंडळामार्फत 1000/- ( अधिक जीएसटी कर) एवढी सल्ला फी आकारण्यात येते. त्यासाठी पणन मंडळाच्या export@msamb.com या इमेल आय.डी. वर ई-मेल केल्यास आवश्यक ती सर्व माहिती ई-मेलद्वारे देणेत येते.
फर्म / संस्थेची स्थापना –कृषिमालाची निर्यात करण्यासाठी आयात-निर्यात परवाना अत्यावश्यक आहे. सदरचा आयात-निर्यात परवाना काढण्यासाठी सर्वप्रथम एखाद्या प्रोप्रायटरी / भागीदारी /प्राईव्हेट लिमिटेड / पब्लिक लिमिटेड / सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी अथवा ट्रस्ट इ. प्रकारच्या संस्थेची संबंधित विभागांकडे नोदणी करावी. राष्ट्रीयकृत / अंकित सहकारी किंवा बहुराष्ट्रीय बँकेमधे संस्थेच्या नावाचे चालू स्वरूपाचे खाते उघडावे लागते. हा परवाना वैयक्तिक नावावरही प्राप्त होऊ शकतो.
आयात – निर्यात परवाना (IEC) – आयात-निर्यात परवाना मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. त्यासाठी खालील लिंक नुसार दिलेल्या सुचनांनुसार अर्जदाराने अर्ज करावा.
संकेतस्थळ – http://dgft.gov.in/exim/2000/iec_anf/ieconlnapplform.htm
दुसरा मजला, पी.एम.टी. वर्कशॉप जवळ,
स्वारगेट, पुणे
संबंधित जिल्हे- पुणे, अहमदनगर, जालना, बीड, कोल्हापूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग व नाशिक
पहिला मजला, व्ही.सी.ए. मैदानासमोर,
सिव्हील लाईन्स, नागपूर-440 001
दूरध्वनी – 0712-2541256
फॅक्स- 0712-2541451
ई-मेल:nagpur-dgft@nic.inसंबंधित जिल्हे-अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ
नवीन मरिन लाईन्स,
चर्चगेट, मुंबई – 400 020
दूरध्वनी-022-22017716 / 22016421
फॅक्स – 022-22063438
ई-मेल:mumbai-dgft@nic.inसंबंधित जिल्हे-राज्यातील इतर उर्वरित सर्व जिल्हे
निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी (RCMC)-आयात निर्यात परवाना प्राप्त झाल्यावर निर्यातवृद्धी परिषदेकडील नोंदणी तथा सहभागी प्रमाणपत्र आवश्यक असते. कृषिमाल व प्रक्रिया पदार्थ निर्यातीसाठी अपेडा, नवी दिल्ली यांचे वेबसाईटच्या द्वारे ऑनलाईन अर्जाद्वारे नोंदणी करता येते.
कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात बिकास प्राधिकरण
विभागीय कार्यालय-मुंबई , बँकींग कॉम्प्लेक्स बिल्डींग,
चौथा मजला, सेक्टर 19 अ, वाशी,नवी मुंबई-400 705
दूरध्वनी : 022 2784 0949
www.apeda.gov.in
नोंदणीसाठी अपेडा रू. 5,000/- एवढी फी (अधिक जीएसटी) आकारते व नोंदणी मार्गदर्शनासाठी पणन मंडळ रू. 500/- (अधिक जीएसटी ) एवढी फी आकारते.