Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी निर्यातीत भारताने नोंदवली लक्षणीय वाढ

वर्ष 2020-21 दरम्यान कृषी आणि कृषीसंलग्न उत्पादनांची निर्यात पोहचली 41.25 अब्जांवर, निर्यातीत 17.34% ची वाढ

देशाच्या कृषी निर्यात क्षेत्राने वर्ष 2020-21 मध्ये उत्तम कामगिरी केली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य सचिव, डॉ अनुप वाधवान यांनी दिली. यासंदर्भात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की गेली तीन वर्षे, स्थिर असलेल्या कृषी आणि कृषीसंलग्न उत्पादनांच्या निर्यातीत (वर्ष 2017-18 मध्ये 38.43 अब्ज डॉलर्स, वर्ष 2018-19 मध्ये 38.74 अब्ज डॉलर्स आणि वर्ष 2019-20 मध्ये 35.16 अब्ज डॉलर्स) वर्ष 2020-21 मध्ये 41.25 अब्ज डॉलर्सपर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे. यात सागरी आणि वनस्पतीजन्य उत्पादनांचा समावेश असून, टक्केवारीनुसार, यंदा निर्यातीत 17.34 टक्क्यांची वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय चलनाच्या हिशेबात सांगायचे झाल्यास, 2020-21 मध्ये ही वाढ 22.62% एवढी म्हणजेच, 3.05 लाख कोटी रुपये आहे, वर्ष 2019-20 मध्ये ही वाढ 2.49 लाख कोटी इतकी होती. वर्ष 2019-20 मध्ये भारताची कृषी आणि कृषीसंलग्न उत्पादनांची आयात 20.64 अब्ज डॉलर्स इतकी, तर 2020-21 मध्ये 20.67 अब्ज डॉलर्स इतकी होती. कोविडच्या काळातही कृषी व्यापारातील समतोल 42.16% नी सुधारला असुव आधी 14.51 अब्ज डॉलर्स असलेला व्यापार 20.58 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला आहे.

कृषी उत्पादनांनी (सागरी आणि वनस्पतीजन्य उत्पादने वगळून) वर्ष 2020-21 मध्ये 29.81 अब्ज डॉलर्सची निर्यात केली असून ती 28.36% इतकी आहे. वर्ष 2019-20 मध्ये ही निर्यात 23.23 अब्ज डॉलर्स इतकी होती. कोविड काळात मुख्य अन्नधान्यांची मागणी वाढल्याचा लाभ भारताच्या निर्यातिला मिळाला.

या काळात कडधान्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली, त्यासोबतच, बासमती तांदळाच्या निर्यातीत 136.04 टक्क्यांपर्यंत म्हणजेच 4794.54 दशलक्ष डॉलर्सची वाढ, गव्हाच्या निर्यातीत 774.17% पर्यंत म्हणजेच 549.16 दशलक्ष डॉलर्सची वाढ, आणि इतर तृणधान्य यांच्या निर्यातीत ( बाजरी, मका आणि इतर भरड धान्ये) 238.28% पर्यंत म्हणजेच 694.14 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली.

इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीतही वर्ष 2019-20 च्या तुलनेत चांगली वाढ नोंदवली गेली आहे. यात, मुख्यतः तेलबियांची ढेप (1575.34 दशलक्ष डॉलर्स -90.28% ची वाढ),साखर(2789.97 दशलक्ष डॉलर्स -41.88% ची वाढ ), कच्चा कापूस (1897.20 दशलक्ष डॉलर्स – 79.43%ची वाढ) ताजा भाजीपाला (721.47 दशलक्ष डॉलर्स – 10.71%ची वाढ) आणि वनस्पती तेल (602.77 दशलक्ष डॉलर्स – 602.77 ची वाढ) इत्यादींचा समावेश आहे.

भारताच्या कृषी उत्पादनांचे सर्वात मोठे आयातदार देश अमेरिका, चीन, बांग्लादेश,आखाती देश, व्हिएतनाम, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, नेपाल, ईराण आणि मलेशिया हे आहेत. या सर्व देशांपिंकी बहुतांशी देशात केल्या जाणाऱ्या निर्यातीत वाढ झाल्याचे आढळले आहे. सर्वाधिक निर्यातवाढ इंडोनेशियात (102.42%),त्याखालोखाल बांगलादेश (95.93%) आणि नेपाळ (50.49%) मध्ये झाली आहे.

आले, मिरे, वेलची, दालचिनी, हळद, केशर अशा सर्व मसाल्याच्या  पदार्थांची, जे त्यांच्या वैद्यकीय औषधी गुणांसाठीही ओळखले जातात- त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वर्ष 2020-21 मध्ये मिऱ्यांची निर्यात 28.72% नी वाढून 1269.38 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोचली,दालचिनीची (कलमी)निर्यात 64.47 % नी वाढून 11.25 दशलक्ष डॉलर्सपर्यंत, जायफळ, जायपत्री आणि वेलचीची निर्यात 132.03%(189.34 दशलक्ष डॉलर्स – 81.60 दशलक्ष डॉलर्स) आणि आले, केशर, हळद,ओवा, तमालपत्र अशा वस्तूंची निर्यात 35.44%  नी म्हणजेच 570.63 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढली. वर्ष 2020-21 मध्ये मसाल्याच्या पदार्थांच्या निर्यातीत आजवरची सर्वाधिक म्हणजेच चार अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली आहे.

वर्ष 2020-21 मध्ये सेंद्रिय पदार्थांची निर्यात 1040 दशलक्ष डॉलर्स इतकी होती, त्या तुलनेत आधीच्या म्हणजेच वर्ष 2019-20 मध्ये ही निर्यात  689 दशलक्ष डॉलर्स इतकी होती. सेंद्रिय उत्पादनांमध्ये तेलबियांची ढेप, तेलबिया,तृणधान्ये आणि बाजरी, मसाले आणि चहा, वनौषधी, सुका मेवा, साखर, डाळी आणि कॉफी यांचा समावेश आहे.

पहिल्यांदाच देशाच्या विविध विभागीय क्षेत्रांमधून (क्लस्टर) ही निर्यात झाली आहे. ताज्या भाज्या आणि आंब्यांची निर्यात वाराणसीहून, आणि काळ्या तांदळाची निर्यात चंदौली इथून निर्यात केली गेली. त्याचा थेट लाभ तिथल्या शेतकऱ्यांना मिळाला गेला.नागपूरच्या संत्र्याचीही तिथूनच थेट निर्यात करण्यात आली. कोविड महामारीच्या काळात, विविध प्रयत्नांनी ताज्या भाज्या आणि फळांची निर्यात सुरूच ठेवण्यात आली होती. त्यासाठी विमानमार्ग, आणि जलमार्गाचाही वापर करण्यात आला.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या विभागाने बाजारपेठ संलग्न व्यवस्था, कापणीनंतरच्या पिकांची किंमत. पीक आल्यानंतर मूल्यसाखळी विकास आणि शेतकरी उत्पादक संघटनांनी संस्थात्मक बांधणी या सगळ्या उपाययोजनांमुळे, ईशान्य भारतातील शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांचे मूल्यवर्धन करत भारताच्या सीमांपलीकडे पाठवणे शक्य झाले आहे.

वर्ष 2020-21मध्ये, तृणधान्याच्या निर्यातीतही प्रगती झाली. भारताने या काळात एकाचवेळी अनेक देशांमध्ये निर्यात केली, उदाहरणार्थ, पहिल्यांदाच तांदळाची निर्यात, तिमोर-लास्ते, पुरेतो रिको,ब्राझील इत्यादी देशांमध्ये करण्यात आली. त्याचप्रमाणे,  गव्हाची निर्यात, येमेन, इंडोनेशिया, भूतान इत्यादी देशांमध्ये आणि इतर, तृणधान्ये, सुदान, पोलंड आणी बोलिव्हिया सारख्या देशात पाठवण्यात आलीत.

कोविड-19 महामारीच्या काळात केलेल्या उपाययोजना

 

कृषी निर्यात धोरण आणि निर्यात प्रोत्साहन उपाययोजना यांची अंमलबजावणी

केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्ये सर्वात पहिल्या कृषी निर्यात धोरणाची आखणी केली. या धोरणाच्या अंमलबजावणी प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्रासह देशातील 18 राज्यांनी राज्य-विशिष्ट कृती योजनेला अंतिम स्वरूप दिले आहे. 25 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य पातळीवरील परीक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. 28 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांनी कृषी निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित नोडल संस्थांची नावे निश्चित केली आहेत.

 

समूह विकास

कृषी निर्यात धोरणाच्या भाग म्हणून, कृषी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी 46 विशिष्ट उत्पादने-जिल्हे यांच्या समूहांची निश्चिती करण्यात आली आहे. विविध समूहांमध्ये समूह पातळीवरील 29 समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

निर्यातीसाठी समूह सक्रीयीकरण: केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने(DoC) समूहांच्या सक्रीयतेसाठी APEDA च्या माध्यमातून अन्न उत्पादन संघटना आणि निर्यातदार यांना जोडण्याकरिता   हस्तक्षेप केला. या जोडणीनंतर मालवाहतूक किंवा माल पाठविण्याच्या प्रक्रियेतील समस्या सोडविण्यात आल्या आणि भूबद्ध (land locked) समूहांकडून निर्यातीला प्रारंभ झाला.

या काही यशोगाथा :

हे क्लस्टर्स कमी किंवा कोणत्याही अतिरिक्त गुंतवणूकीशिवाय विद्यमान स्रोतांचा  वापर करून कार्यान्वित करण्यात आले आहेत. या क्लस्टर्सकडून नियमितपणे निर्यात  होत आहे.

देशासाठी विशिष्ट कृषी निर्यात धोरण अहवाल: उत्पादने निश्चित करून त्यांची संभाव्यता आणि देशनिहाय कृषी-निर्यात धोरण तयार करण्याच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी  60 भारतीय शिष्टमंडळे आणि भागधारकांशी संवाद साधण्यात आला.

उत्पादन-विशिष्ट उपाययोजनांवरील अहवाल: भारताच्या निर्यातीला चालना देण्यासाठी व्यापारात सध्या अस्तित्त्वात असलेल्या एसपीएस / टीबीटीच्या प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी विस्तृत विश्लेषण करण्यात आले. ”भारताच्या कृषी निर्यात दराचे तोटे ” हा अहवाल कृषी निर्यात धोरणाअंतर्गत निर्यात वाढविण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या संभाव्य निर्यात उत्पादनांवर आधारित आहे

खरेदीदार आणि विक्रेत्याची आभासी माध्यमातून भेट –  विविध देशांसह  खरेदीदार आणि विक्रेत्याच्या  चोवीस आभासी भेटींचे आयोजन करण्यात आले होते.

ई-कॅटलॉग जाहीर करण्यात आले त्यात खरेदीदार आणि विक्रेत्याच्या प्रत्येक भेटीमध्ये  सहभागी निर्यातदार, आयातदार, व्यापार संघटनांचा तपशील आहे.

आभासी व्यापार मेळावा  ( व्हीटीएफ)-  अपेडाने पुढाकार  घेत स्वतःचा  आभासी व्यापार मेळावा  (व्हीटीएफ) अनुप्रयोग विकसित केला. हे आभासी व्यासपीठ कित्येक देशांच्या कृषी  आयातदारांना आणि आपल्या निर्यातदारांना सहभागाद्वारे संवाद साधण्याची संधी प्रदान करत आहे . 10 ते 12 मार्च, 2021 दरम्यान पहिलाच  तृणधान्य उत्पादन क्षेत्रासाठी आभासी व्यापार मेळावा आयोजित करण्यात आला होता.ताजी  फळे आणि भाज्यांसाठी 27 ते 29 मे , 2021 दरम्यान आभासी व्यापार मेळावा घेण्यात आला.

भारताचे वेगवेगळ्या दूतावासांमधील कृषी कक्ष-  विद्यमान बाजारपेठ माहिती विभागाला अधिक बळकट करण्यासाठी, प्रत्यक्ष वेळेच्या आधारावर माहिती शोधण्याच्या दृष्टीनं अपेडा विविध देशांमधील आपल्या शिष्टमंडळातील 13 कृषी कक्षांशी सल्लामसलत करत आहे . विशिष्ट देशांशी संबंधित धोरण तयार करताना कृषी कक्षाकडून  प्राप्त झालेल्या एकत्रित अहवालाचा संदर्भ दिला जात आहे.

शेतकरी कनेक्ट पोर्टल : एफपीओ / एफपीसी,सहकारी संस्थांना  निर्यातदारांशी संवाद साधण्यासाठी  एक व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या दृष्टीनें अपेडाच्या  संकेतस्थळावर शेतकरी कनेक्ट पोर्टल स्थापित करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे 2360 एफपीओ / एफपीसी आणि 2324 निर्यातदारांची या पोर्टलवर नोंदणी  झाली आहे.

मध्य पूर्वेवर लक्ष केंद्रित : मध्य पूर्व देशांमध्ये निर्यातीला  चालना देण्यासाठी या देशांमधील भारतीय शिष्टमंडळांशी   सल्लामसलत करून देश -विशिष्ट कृषी निर्यात धोरण तयार करण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील सात देशांमध्ये अशा खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या आभासी भेटींचे आयोजन करण्यात आले होते. उदा. युएई, ओमान, बहरैन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया आणि इराण.आखाती प्रदेशातील कृषी उत्पादनांच्या निर्यातीत वाढ करण्याच्या धोरणासंदर्भात आखाती सहकार परिषदेतील देशांमधील (ओमान, सौदी अरेबिया, युएई आणि बहरीन) भारतीय दूतावासांनी आभासी बैठक आयोजित केली होती.

 

बाजारपेठांची उपलब्धता

कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सहकार्याने  बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी संबंधित विभाग प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये डाळिंबासाठी, अर्जेटिनामध्ये आंबा आणि बासमती तांदूळ; इराणमध्ये गाजर बियाणे; उझबेकिस्तानमध्ये  गव्हाचे पीठ, बासमती तांदूळ, डाळिंबाचे बीज, आंबा, केळी आणि  सोयाबीनची पेंड ; भूतानमध्ये टोमॅटो, भेंडी आणि कांदा; आणि सर्बियामध्ये संत्री यासाठी भारताला  अलीकडेच  बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

 

नवीन उत्पादनांवर लक्ष केंद्रित

भारताच्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीची व्याप्ती  वाढविण्याकरिता आणि  भारतातील विशिष्ट उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासंदर्भात  खाली काही उदाहरणे दिली आहेत:

भौगोलिक निर्देशांक (जीआय) प्रमाणित डहाणू घोलवड चिकू (200 कि.ग्रा.) महाराष्ट्रातील पालघर मधील डहाणू-घोलवड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून युनायटेड किंग्डमला निर्यात करण्यात आला.

Exit mobile version