एकविसाव्या शतकातील माणूसही इंटरनेटच्या वेगाने धावत आहे. त्याला सर्व काही तयार हवं आहे व त्यासाठी तो पॅसे मोजायला तयार आहे. त्यात ऑनलाइन मार्केटमध्ये ब-याच कंपन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपड़े व इतर गृहोपयोगी वस्तू आकर्षक पॅकेजिंगमध्ये घरपोच करतात; त्यामुळे शेतक-यांच्या मालालाही यामध्ये मोठा वाव आहे.
शेतमालाची ‘कॅश ऑन डिलीव्हरी’
वस्तू मिळाल्यावर पैश्याच्या स्वरूपात तिची किंमत मोजतो, याच संकल्पनेला ‘कॅश ऑन डिलीव्हरी’ म्हणतात. या संकल्पनेवर आधारित शेतकरी आपला भाजीपाला विकू शकतो. त्यासाठी भविष्यातील आव्हाने ओळखून शेतक-यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरण्याची व शेतमालाचे प्रक्रियेतून मूल्यवर्धन करण्याची गरज आहे. त्यामुळे काही प्रमाणात अपेक्षित दर मिळविणे व शेतीमालाचे नुकसान टाळणे शक्य होईल.
थेट भाजीपाला विक्री
योग्य बाजारपेठेअभाची किंवा प्रक्रिया न केल्यामुळे शेतमालाचे, विशेषतः भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. भाजीपाला निर्जलीकरण ह्या यावर एक उत्तम पर्याय आहे. मात्र या संकल्पनेतून शेतकरी आपला सर्व शेतमाल विकू शकतो. बाजार समितीतील लेिलाच पद्धती, मध्यस्थांचे कमिशन व उचांकी आवक यांमुळे शेतमालाचे दर पडतात. या सर्व अडचणींवर ‘थेट घरपोच भाजीपाला पुरवठा’ ही संकल्पना काहीशा प्रमाणात नियंत्रण आणू शकते. यासाठी शेतक-यांनी खालील गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे.
- उत्तम दर्जाचे कृषिमाल उत्पादन,
- अत्याधुनिक लागवड ते कृषिमाल विपणन,
- ग्राहक वर्गाच्या पसंतीचा अभ्यास,
- कीटकनाशकांचा कमीत कमी वापर,
- सेंद्रिय शैतीचा अवलंब,
- दर्जात्मक मालाची निवड,
- आकर्षक पॅकेजिंग,
- दैनंदिन व वेळेत भाजीपालापुरवठा,
- साप्ताहिक अथवा मासिक ग्राहक अभिप्राय व
- मोबाईल, सोशल नेटवर्किंग साइट्सचा प्रभावी वापर
भाजीपाल्याच्या मार्केटिंगसाठी पुणे-मुंबई यासारखी मोठी शहरे शेतकरीवर्गाला खुणावत आहेत. ही मोठी संधी ओळखून यात उतरले पाहिजे. तसेच ‘नंबर फिरवा आणि भाजी मिळवा’ ह्य उपक्रमसुद्धा राबवू शकतो. यात शेतकरी भाजीपाला तसेच इतरही कृषिमाल उदा. धान्य, डाळी, फळे व इतर कृषिमाल विकून चांगले अर्थार्जन करू शकतो.
काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषिक्षेत्रात ब-याच प्रमाणात नुकसान होताना दिसते. या समस्येवर कृषिमाल प्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. इस्राईल तथा स्वित्झर्लंडमध्ये ५० टक्के शैतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे; मात्र योग्य व्यवस्थापन च कोशल्याअभात्री त्याचर प्रक्रिया होत नाही.
योग्य व्यवस्थापनाला ज्ञानाची जोड़ दिली, तर भाजीपाला निर्जलीकरण, दुग्धप्रक्रिया आदी उद्योग शेतकरी उभारू शकतात. शेतीवरील उत्पादनाला योग्य किंमत हवी असेल, तर शेतक-यांनी शेतीमाल प्रक्रियेकडे वळावे .