Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतकरी मित्रांनो उद्योजक व्हा! अशी स्थापन करा प्रोड्यूसर्स कंपनी

प्रोड्यूसर्स कंपनी ही सहकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संकर आहे. त्यामध्ये सहकार आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चांगले चांगले गुण एकत्र करून शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून प्रोड्यूसर्स कंपनीचा कायदा बनवण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्राथमिक उत्पादन करणारे म्हणजे शेतकरी, दूध उत्पादक आणि इतर दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती, कोणत्याही दोन प्राथमिक उत्पादक कंपन्या किंवा उत्पादक संस्था किंवा दहा किंवा दहापेक्षा जास्त व्यक्ती आणि प्रोड्यूसर्स कंपनी एकत्र येऊन स्वत:ची प्रोड्यूसर्स कंपनी स्थापन करू शकतात.

प्रोड्यूसर्स कंपनीचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लहान शेतकरी आणि उत्पादकांना एकत्र करून त्यांना उत्पादनपूर्व काळात शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते औषधे, आर्थिक सहाय्य, पीक व शेतकरी विमा आणि उत्पादन काढणी पश्चात एकत्रित विक्री व्यवस्था, प्रक्रिया आणि बाजाराच्या मागणीनुसार शेतमाल उत्पादन इ. निर्माण करणे हा आहे. या मागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची किंवा उत्पादकांची होणारी लूटमार थांबवून उत्पादनासाठी आवश्यक असलेले साहित्य थेट उपलब्ध करणे व उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उत्पादक ते ग्राहक विक्री साखळ्या उभ्या करणे हा आहे.

कंपनीमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या उत्पादकांचा एकत्र येण्यामागील हेतू, उत्पादन आणि भौगोलिक परिस्थिती, एकत्र येण्याची गरज, बाजारात येणार्‍या अडचणींसारख्या असाव्यात.

मुळातच सक्षम असणारे बचत गट, त्यांचे फेडरेशन, सहकारी सोसायट्या स्वत:ला प्रोड्यूसर्स कंपनीमध्ये बदलण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. कुठलीही शासकीय संस्था किंवा विभाग प्रोड्यूसर्स कंपनी उभारण्यास पुढाकार घेऊ शकतो.

शेतकरी उत्पादक कंपन्यांची कृषी विस्तार व विकासातील व्यवहार्यता

छोट्या शेतक-यांना आता संघटित करणे आवश्यक बाब असल्याचे सिद्ध झाले आहे. शेतक-यांना त्यांचे सामूहिक उत्पादन आणि विपणन यामधून फायदा करण्याकरिता सर्वात योग्य मार्ग म्हणजे कंपनी कायद्याच्या (1956) विशेष तरतूदी अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे की, ज्यामुळे शेतक-यांना संघटित करून त्यांचा सामुहिक शक्तींचा उपयोग होण्यासाठी त्यांचा क्षमताविकास करणे शक्य झाले आहे.

उत्पादक कंपनीचा मूळ हेतू हा छोट्या शेतक-यांना शेतीच्या निविष्ठा व विस्तार सेवांसाठी एकत्रित करणे (Backward Linkes) आणि सामूहिक विपणन प्रक्रिया आणि बाजाराभिमुख कृषि उत्पादनासाठी पुढील बाजार घटकांशी जोडणे (Forward Linkes) असा आहे. उत्पादक कंपनींचा व्यवसाय हा छोटा आहे आणि मग त्याचा व्यवसाय विकास आराखडा करणे गरजेचे आहे का? असे प्रश्न विंचारले जातात. याचे उत्तर होय असे आहे. कारण त्यासाठीच शेतकरी सदस्य प्रथमच एकत्र येऊन व्यावसायिकाप्रमाणेच कृती करतील असे अपेक्षित आहे.

उत्पादक कंपनीची व्यवसाय नियोजन प्रक्रिया

व्यवसायाची नियोजन प्रक्रिया ही व्यवसाय कल्पनेतून साकारली जाते यांच्या विश्लेषणातून व्यवसायातील संधी हेरल्या जातात. असे केल्यानंतर पणन संदर्भातील नियोजन करण्यात येते आणि या प्रक्रियेतील अंतिम टप्पा ह्या वित्तीय नियोजनाचा असतों.

व्यवसाय कल्पनांची निर्मिती

व्यवसाय नियोजनातील पहिली पायरी म्हणजे व्यवसायातील संधी ओळखणे हे होय. शेतकरी उत्पादक कंपनींच्या बाबतीत व्यवसायाचे क्षेत्र हे अगोदरच स्पष्ट झालेले असते. म्हणजेच छोट्या शेतक-यांसाठीचा कृषिव्यवसाय करणे हे होय. परंतु या कृषि व्यवसायातील विशेष करून कोणत्या संधीशी संबंधित व्यवसाय करावा, ही बाब ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे.

उत्पादन व सेवांचा विकास

प्रथम शेतक-यांच्या अनुभवावर त्यांना भेडसावणाच्या समस्यांना समाधानकारक उपाय ठरू शकेल अशा संकल्पनांचा उपयोग करणे. एकत्रित खरेदी करणे आणि त्यांची शेतकरी सदस्यांना विक्री करणे, ही एक कृतिशील व्यवसाय संकल्पना असून ज्यामध्ये कृषि निविष्ठा मध्यस्थांची साखळी कमी होण्याबरोबरच शेतक-यांना दर्जेदार निविष्ठा आणि सेंवा मोठ्या प्रमाणावर मिळण्याची खात्री असते. तसेच शेतक-यांना अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी असणारे नवीन तंत्रज्ञान किंवा निविष्ठा यांचा व्यवसाय करणे आवश्यक असतें.

अनेक शेतकरी अजूनही हाताने चालविणारे किंवा बैलाच्या सहाय्याने वापरण्यात येणा-या अवजारांचा उपयोग करतात आणि प्रत्येक शेतक-याकडे ही अवजारे व महत्वाची ट्रॅक्टरचलित अवजारे आणि यंत्रे भाडेतत्वावर शेतक-यांना उपलब्ध करून देणे, हा सुध्दा एक पर्याय असून त्यामुळे शेती ही कमी खर्चात विशिष्ट कालावधीत परिणामकारकरीत्या करणे शक्य होते.

कृषि विस्तार सेवा

राज्याच्या कृषि विस्तार सेवेशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्या कृषि चिकित्सालयाची सुरुवात करून त्यांच्या माध्यमातून व्यावसायिक तंत्रज्ञान सेवा शेतक-यांना किफायतशीर दराने पुरवू शकतात. त्याचप्रमाणे पीक विमा सारख्या सेवांचा शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर लाभ उपलब्ध करून देऊ शकतात.

उत्पन्न मिळवून देणा-या घटकांचा प्राधान्यक्रम (Prioritize Earning Drivers)

सुरवातीस कंपनीच्या उत्पन्न वाढीतील घटक ओळखून त्याची माहिती ठेवणे महत्वाचे असते, कारण यामुळे कंपनीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो.

महत्वाच्या पायाभूत सुविधा ओळखणे.

यामध्ये आवश्यक असणा-या पायाभूत सुविधा ज्यामध्ये मनुष्यबळ, यंत्रे व सामुग्री इ. चा समावेश असून ज्यामुळे उत्पादक कंपनीस आपल्या व्यवसायात वाढ़ करता येते.

यामध्ये पुढील टप्प्यात व्यवसायातील संभाव्य धोके ओळखणे याचा समावेश होतो. व्यवसायातील कच्चे दुवे ओळखणे, ज्यावर व्यवसाय अवलंबून कंपनीचे कर्मचारी जसे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांच्यावर उत्पादक

विकास आराखडा तयार करणे, आपले धोरणात्मक ध्येय ओळखणे अशा जबाबदार्‍या असतात. असे केल्यानंतर प्रत्येक जोखीम कमी करण्यासाठी उपलब्ध संधी ओळखता येतात.

जोखमीच्या परिस्थितीचे संनियंत्रण

प्रत्येक जोखीम कमी करण्यासाठी योग्य पर्याय उपलब्ध असू शकतात. मूल्यमापनातील सर्वात महत्वाच्या प्रतिसादावर विचार करण्यासाठी बाहेरच्या परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक असते. काही जोखीम या बदलत्या राजकीय व धोरणात्मक बदलामुळे उत्पादक कंपनीच्या नियंत्रणाबाहेर असू शकतात. परंतु इतर ब-याच जोखीमांचे व्यवस्थापन करता येऊ शकते. विविध जोखीम असलेल्या बाबींचा अंदाज घेऊन उत्पादक कंपनीने प्रत्येक जोखीम कमी करण्यासाठी किती आर्थिक गुंतवणूक करावी, याचे मूल्यमापन करावे.

उत्पादक कंपनीच्या जोखीमांची परिस्थिती सारखी बदलत असते. जशी शासकीय नियंत्रण त्याचबरोबर उत्पादने आणि प्रक्रिया पद्धतीतील बदल इ. संभाव्य धोक्याच्या परिस्थितीची जाणीव झाल्याबरोबर उत्पादन कंपनीने जोखीम आराखडा राबविणे आवश्यक असते. उत्पादक कंपनीचा सविस्तर जोखीम आराखड़ा विकसित करणे ही एक दिर्घप्रक्रिया असते. तथापि, साध्या स्वयंमूल्यमापनातून नियोजनातील मोठी तफावत दूर करण्यास मदत होऊ शकते.

एकदा व्यवसायातील संधी शोधल्यानंतर त्यांचे विपणन विश्लेषण करावेच लागते. याच्या विश्लेषणासाठी आवश्यक असणारी माहिती ही दुय्यम स्रोताकडून जसे कृषि उत्पन्न बाजार समितीने खरेदी केलेल्या कृषिमालाची माहिती, मार्गदर्शक सूचना, संस्थेंनी केलेला विशेष अभ्यास इत्यादिंचा समावेश घेणे आवश्यक असते. बाजारव्यवस्थेतील संधी, बलस्थाने आणि जोखीम इ. माहितीच्या आधारे विक्रीचे धोरण सुनिश्चित करणे आवश्यक असते.

निवडलेला पर्याय अनेक विक्रीची उद्दिष्टे, ज्यामुळे बाजारपेठेत किती लवकर प्रवेश करावयाचा याचा समावेश होतो. यामध्ये एकापेक्षा अधिक धोरणांचा समावेश होऊ शकतो. परंतु आवश्यक धोरणे एकत्रितरीत्या राबवून योग्य विक्रीचे धोरण विकसित करणे आवश्यक असते. शेती ही आपली जीवनपद्धती आहे. शतकानुशतके या शेतीने आपले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक जीवनमान घडविण्यासाठी हातभार लावला आहे.

आजही राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रोजगार निर्मितीचा प्रमुख स्रोत हा शेती व्यवसायच आहे. यामध्ये महत्वाची भूमिका आहे ती कष्टकरी शेतक-याची परंतु हवामानातील बदल, अवेळी मिळणारा कमी मोबदला या दृष्टचक्रात अडकलेल्या शेतक-यांचे शेतीमधील शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषि संशोधन व विस्ताराच्या संरचनेत प्राधान्य देणे आवश्यक राहील.

नवीन व्यवसाय विकास संकल्पना

नवीन व्यवसायाच्या संकल्पना विंकसित करण्यासाठी गट चर्चा हे सर्वसामान्यपणे वापरण्यात येणारे तंत्र आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येते. पहिल्या टप्प्यात अनेक व्यवसाय संकल्पना शोधण्यावर भर देण्यात येतो, ज्यामध्ये व्यवसाय संकल्पनेच्या गुणवत्तेवर अधिक चर्चा करण्यात येत नाही. एकदा व्यवसाय संकल्पनांची यादी केल्यानंतर प्रत्यक्ष व्यवसायासाठी अनुकूल परिस्थितीत उपलब्ध संधी व धोके ओळखणे याचा समावेश होतो. यानंतर व्यवसाय संकल्पनेचे मूल्यमापन करून पुढे व्यवसाय निर्मितीची उपयोगिता तपासली जाते. यासाठी निवडलेल्या सर्व व्यवसाय संकल्पनेशी संबंधित व्यवसायातील संधी व धोके यांचे मूल्यमापन करण्यात येते.

व्यवसायातील संधी व धोके यांचे विश्लेषण करण्याबरोबरच धोके कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. धोक्याचे पूर्णपणे निराकरण करणे हे उद्दिष्ट नसून संभाव्य धोके ओळखणे आणि त्यांचे विश्लेषण करून कार्यात्मक पद्धतीने त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.

जे धोके किंवा व्यवसायातील जोखमीचे व्यवस्थापन करणे अवघड असते असा व्यवसाय सुरू न करणे सर्वात जास्त हिताचे असते. एकदा व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसायात जोखीम ही सुरू होतेच. यासाठी व्यवसायातील धोके/जोखीम कमी करण्यासाठी कार्यपद्धती व धोरणे तयार ठेवून ते कमी करणे आवश्यक असते. यासाठी पुढील महत्वाच्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

Exit mobile version