Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

अकोला-भाजीपाला मार्केट बंदचा फटका

वांग्याला भाव नसल्याने वांगे फेकण्याची वेळ भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना संसर्गाचे वर्ष उलटल्यानंतरही त्याची धग कायम आहे. लॉकडाउनच्या नावानेही आता अंगावर काट उभा राहतो. वर्षभरानंतरही या संकटातून सावरू शकलो नाही. आता तर कोविड विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील बाजार समित्या व ग्रामीण भागातील बाजार बंद आहेत. त्याचा फटका शेवटी
भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. घामा गाळून पिकवलेला भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. दानापूर परिसरातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात पिकविलेली वांगी गुरांना खाण्यासाठी टाकल्यानंतर लॉकडाउनचा परिणाम किती भयावह आहे याचा प्रयत्य आला. सचिन पिलात्रे अस या शेतकऱ्याचे नाव आहे.

तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची मुबलकता असल्यामुळे या परिसरात बागायती क्षेत्रफळ मोठं आहे .त्यात शेतकरी मोठी मेहनत करून भाजीपाला व फळ पिके घेतात .मात्र कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने लावून दिलेले नियमात चे पालन करीत ग्रामीण भागातील बाजारपेठ व बंद चा फटका भाजीपाला, व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सोबतच माल बाजार पेठेत आणल्यास त्यांची व्यापारी वर्ग उचल करण्यासाठी तयार नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे. ग्रामीण भागातील बाजार बंद मुळे एक रुपया किलो भाव वांग्याला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना झाड निरोगी ठेवण्यासाठी वांग्याची तोडणी करून त्यांना गुरांच्या पुढे टाकण्याची वेळ आली आहे. अकोल्यातील दानापूर परिसरात भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तर लग्न करण्यावर घातलेल्या निर्बंध ग्रामीण भागात लग्ना मध्ये वांग्याच्या भाजीला फार महत्त्व आहे मात्र ,लग्न करतांना घालून दिलेल्या लोकांच्या उपस्थितीती वर शासनाचे लक्ष असल्याने लग्न अगदी कमी लोकांत होत असल्याने वांग्याची मागणी कमी झाली आहे. त्यातच शेकऱ्यांनच्या समोर उभं ठाकलेल नैसर्गिक संकट, वाढत तापमान जाणारे यामुळे भाजीपाला व फळ उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.याकडे शासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

Exit mobile version