Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

आतापर्यंत ४२.५५ मे.टन धानाची हमीभावाने खरेदी

11 ऑक्टोबरपर्यंत 3.57 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून 8032.62 कोटी रुपये किंमतीच्या 42.55 लाख मेट्रिक टन धानाची हमीभावानुसार खरेदी

खरीपाचा, वर्ष 2020-21 चा विपणन हंगाम सुरु झाला असून, केंद्र सरकारने, सध्याच्या हमीभाव योजनेनुसार शेतकऱ्यांकडून हमीभावाने पिकांची खरेदी सुरु केली आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी धान म्हणजेच भातपिकाची खरेदी सुव्यवस्थित सुरु असून, 11 ऑक्टोबर 2020 पर्यंत, 3.57 लाख शेतकऱ्यांकडून 8032.62 कोटी रुपये किंमतीच्या 42.55 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे.

        

त्याशिवाय, राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार, याच खरीप हंगामासाठी 30.70 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांना ही मंजूरी देण्यात आली आहे.

11 ऑक्टोबरपर्यंत, सरकारने नोडल संस्थांच्या माध्यमातून, 4.36 कोटी रुपयांच्या 606.56 मेट्रिक टन मूग आणि उडीद डाळींची किमान हमी भावानुसार खरेदी केली आहे. तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील  533 शेतकऱ्यांकडून ही खरेदी करण्यात आली आहे.

खोबरे आणि उडीदविषयी सांगायचे झाल्यास, या दोन्ही मालाच्या उत्पादक राज्यात, सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक आहे. खरीप हंगामातील मूग आणि इतर खरीप डाळी तसेच तेलबिया यांच्या खरेदीला सुरुवात करण्यासाठी संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी तयारी सुरु केली आहे.

        

कापसाच्या खरेदीला एक ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत, म्हणजेच 11 ऑक्टोबरपर्यंत, भारतीय कापूस महामंडळाने 5252 शेतकऱ्यांकडून 7545 कोटी रुपये किमतीच्या 24863 गासड्या कापसाची खरेदी हमीभावानुसार पूर्ण केली आहे.

Exit mobile version