55 वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम

राज्याच्या गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस दलातील 55 वर्षावरील अधिकारी, कर्मचा-यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. अशा अधिकारी, कर्मचा-यानी कामावर न येता घरुनच काम करायचे आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, पोलीस दलातील सक्रिय रुग्णसंख्या आता 265 वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना 24 तास कामावर हजर रहावे लागत आहे.

गृह विभागाने याची गंभीर दखल घेत पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनादेखील वर्क फ्रॉम होम ही पद्धत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कोरोनाचा वाढता धोका पाहता पोलिसांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू केल्याचे गृहमंत्री वळसे- पाटील यांनी सांगितले.