देशात सध्या ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशातील राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यानंतर 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील शाळांची घंटा वाजली होती. त्यामुळे शाळा गजबल्या होत्या. मात्र आता ठाकरे सरकार पुन्हा शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.
देशात ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटचा वाढता धोका पाहता राज्यातील शाळा पुन्हा बंद होऊ शकतात, असे संकेत राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
देशातील एकूण 213 ओमायक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात 54 रुग्णांची नोंद केली गेली आहे. ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.