Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

नाशिक, दि. १९ : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मॉन्सूनचा पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून पुढील २४ तासांत नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड तसेच ठाणे आणि मुंबई परिसरात तीव्र ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नाशिक आणि ठाणे येथे १९ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.

दरम्यान आज सकाळपासून नाशिक परिसरात ढगांनी दाटी केली असून थंड वारे वाहत आहेत. पावसाची संततधार सुरु असून दुपारपर्यंत गंगापूर धरणातील पाणीसाठा २ टक्क्यांनी वाढल्याची माहिती आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणात पाणीसाठा वाढला असून असाच पाऊस सुरु राहिल्यास जायकवाडी धरणात जाणाऱ्या विसर्गात वाढ होऊन मराठवाड्याची तहान भागू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे.

 

सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

पुढील २४ तासांमध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. तर मुंबईतही पुढच्या काही तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. कोकणामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यावेळी विदर्भ आणि मराठवाडामध्ये चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने म्हटले आहे.

दरम्यान या पावसाने वाढीच्या अवस्थेत असलेल्या खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Exit mobile version