हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील दोन तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परतीचा पाऊस सक्रिय झाल्याचे हे संकेत आहेत.
अरबी समुद्राच्या पूर्वमध्य परिसर व कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्रवाताची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उत्तर प्रदेशच्या वायव्य भाग ते मध्य प्रदेशचा नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र विदर्भाकडे सरकरण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.