रेल्वेची प्रतीक्षा यादी कायम राहणार

राष्ट्रीय रेल्वे योजनेच्या मसुद्याविषयी देण्यात आलेल्या काही बातम्यांमध्ये, रेल्वेमध्ये  2024 पासून प्रतिक्षा यादी  राहणार नाही किंवा  2024 पासून फक्त निश्चित झालेली तिकिटेच देण्यात येतील असे सूचित करण्यात आले आहे. मात्र प्रतिक्षा यादीची तरतूद  हटवण्यात येणार नाही असे स्पष्टीकरण  रेल्वेने यासंदर्भात दिले आहे.

मागणीनुसार गाड्या उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.यामुळे प्रवाशांना प्रतिक्षा यादीत तिष्ठत राहण्याची शक्यता कमी होईल. मात्र एखाद्या गाडीत उपलब्ध असणाऱ्या आसनापेक्षा किंवा बर्थपेक्षा प्रवाश्यांची जास्त मागणी असल्यास प्रतिक्षा यादीची सुविधा राहील. मागणी आणि उपलब्धता यातला  चढउतार झेलण्याचे काम ही सुविधा करते.