विदर्भातील पहिला अ‍ॅग्रीकल्चर मॉल अमरावतीत होतोय सुरू

कृषी केंद्र डॉट कॉमची फ्रॅँचायझी आता अमरावतीत

कृषी प्रधान भारतातील आधुनिक शेतकºयांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुण्यातील शहरी लोकांप्रमाणेच आता शेतकरीही भव्य मॉलमध्ये कृषी उत्पादनांच्या खरेदीचा आनंद घेणार आहे. शेती आणि शेतीशी संबंधित सर्व उत्पादनांची विक्री एकाच छताखाली होणारा विदर्भातील पहिलाच अ‍ॅग्रीकल्चर मॉल दसºयाच्या मुहूर्तावर अमरावती शहरात जाफरजीन प्लॉट येथे सुरू होतोय. विनुष्का सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या कंपनीचा हा खास शेतकºयांच्या सन्मानासाठी आणि सोयीसाठी उपक्रम आहे.

याआधी कंपनीतर्फे देशातील पहिले कृषी आॅनलाईन स्टोअर krushikendra.com सुरू झाले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मेगा स्टोअरमध्ये बियाणे, किटकनाशके, खते, मायक्रोन्यूट्रियन्टस्, सरफेक्टंटस्, कृषी अवजारे, कृषी पंप अशा अनेक गोष्टी या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. आॅनलाईन विक्रीच्या सुविधेमुळे शेतीउपयोगी वस्तू शेतकºयांना घरपोच मिळतात. अशा दोन हजाराहून जास्त वस्तू प्रत्यक्ष मॉलमध्ये, तसेच आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकरी बांधव त्याचा लाभ घेऊ शकतात.

कृषीकेंद्र डॉट कॉम ही शेतकºयांना घरपोच वस्तू सेवा देणारी पहिलीच मेगा आॅनलाईन कृषी स्टोअर आहे. याशिवाय शेतकरी मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांच्या निरसनासाठी याठिकाणी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली असून आजतागायत हजारो शेतकºयांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. लवकरच शेतकºयांच्या सोयीसाठी टोलफ्री नंबर, चॅट कॉलरची सुविधा कंपनीकडून देण्यात येणार आहे. याशिवाय बाजारभावाची ताजी माहिती कळावी यासाठी अ‍ॅपही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

विनुष्का सोल्यूशन्स प्रा. लिमिटेडच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेमुळे शेतकºयांना आता सुलभतेने शेती उत्पादनांची खरेदी करता येणार असून त्यांचा वेळ वाचणार आहे. लवकरच संपूर्ण महाराष्टÑात असे फ्रेंचाईझी स्टोअर्स सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती विनुष्का सोल्यूशन्सच्या संचालकांनी दिली.