8 महिन्यांच्या कालावधीनंतर गेल्या 24 तासांत दैनिक स्तरावर 131 कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद
भारतातील सक्रीय कोविड रुग्णांची संख्या कमी होऊन आज 1 लाख 84 हजार (1,84,182) झाली आहे. सध्याची सक्रीय रुग्णसंख्या आतापर्यंत नोंदल्या गेलेल्या एकूण सक्रीय रुग्णसंख्येच्या फक्त 1.73% आहे.
सध्या सक्रीय असलेल्या रुग्णसंख्येपैकी जास्त रुग्ण देशातील फक्त दोन राज्यांमध्ये एकवटले आहेत. एकूण सक्रीय कोविड रुग्णांपैकी 64.71% रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये एकवटलेले आहेत.
यापैकी केरळमध्ये 39.7% तर महाराष्ट्रात 25% सक्रीय रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत 226 ची घट नोंदली गेली. तर या कालावधीत, देशभरात 13,203 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दुसरीकडे, गेल्या 24 तासांत 13,298 कोविड रुग्ण रोगमुक्त झाले.
गेल्या 24 तासांत 131 कोविड रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या 8 महिन्यातील हा नीचांक आहे.
भारतात आजपर्यंत कोविड संसर्ग तपासणीसाठी एकूण 19,23,37,117 चाचण्या झाल्या आहेत.
21राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा (1,39,374) जास्त प्रतिदशलक्ष चाचण्या झाल्या आहेत.
देशातील 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी प्रतिदशलक्ष चाचण्या झाल्या.
देशव्यापी कोविड – 19 लसीकरण मोहिमेद्वारे 25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 16,15,504 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत 694 सत्रांमध्ये 33,303 लोकांना लस दिली गेली. आतापर्यंत लसीकरणासाठी अशी 28,614 सत्रे झाली आहेत.
प्रत्येक राज्यातील आतापर्यंत लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या खालील तक्त्यात दिली आहे.
S. No. | State/UT | Beneficiaries vaccinated |
1 | A & N Islands | 2,019 |
2 | Andhra Pradesh | 1,47,030 |
3 | Arunachal Pradesh | 6,511 |
4 | Assam | 13,881 |
5 | Bihar | 76,125 |
6 | Chandigarh | 1,502 |
7 | Chhattisgarh | 28,732 |
8 | Dadra & Nagar Haveli | 345 |
9 | Daman & Diu | 283 |
10 | Delhi | 25,811 |
11 | Goa | 1,561 |
12 | Gujarat | 78,466 |
13 | Haryana | 72,204 |
14 | Himachal Pradesh | 13,544 |
15 | Jammu & Kashmir | 11,647 |
16 | Jharkhand | 14,806 |
17 | Karnataka | 1,91,449 |
18 | Kerala | 53,529 |
19 | Ladakh | 558 |
20 | Lakshadweep | 633 |
21 | Madhya Pradesh | 38,278 |
22 | Maharashtra | 99,885 |
23 | Manipur | 2,319 |
24 | Meghalaya | 2,236 |
25 | Mizoram | 3,979 |
26 | Nagaland | 3,443 |
27 | Odisha | 1,52,371 |
28 | Puducherry | 1,478 |
29 | Punjab | 31,327 |
30 | Rajasthan | 93,525 |
31 | Sikkim | 960 |
32 | Tamil Nadu | 61,720 |
33 | Telangana | 1,10,031 |
34 | Tripura | 14,252 |
35 | Uttar Pradesh | 1,23,761 |
36 | Uttarakhand | 10,514 |
37 | West Bengal | 84,505 |
38 | Miscellaneous | 40,284 |
Total | 16,15,504 |
देशात आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्यांची संख्या 1 कोटी 3 लाखांच्या आसपास (1,03,30,084) असल्याने रोगमुक्तीचा दर आता 96.83% झाला आहे. रोगमुक्त झालेले एकूण रुग्ण आणि सध्या सक्रीय असलेले रुग्ण यांच्यातील अंतर वाढत असून सध्या ते 1,01,45,902 इतके आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 79.12% रुग्ण 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे.
केरळ राज्यात एका दिवसांत सर्वाधिक म्हणजे 5,173 व्यक्ती रोगमुक्त झाल्या असून त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 1,743 तर गुजरातमध्ये 704 व्यक्ती रोगमुक्त झाल्या.
नव्या बाधितांपैकी 81.26% रुग्ण 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
केरळमध्ये गेल्या 24 तासांत दैनिक पातळीवर सर्वाधिक म्हणजे 6,036 नव्या बाधितांची नोंद झाली तर काल महाराष्ट्रात 2,752 आणि कर्नाटकात 573 नव्या कोविडग्रस्तांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत कोविडमुळे बळी गेलेल्यांची संख्या 131 आहे त्यापैकी 80.15% मृत्यू सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेले आढळले.
महाराष्ट्रात 45,केरळमध्ये 20 तर दिल्लीत 9 रुग्णांचा मृत्यू झाला.