वर्ष 2020-21 मध्ये पी अँड के खतांवरील अनुदानाची टक्केवारी 22.49% ते 28.97% या दरम्यान
देशातील सर्व शेतकऱ्यांना 242 रुपये प्रती 45 किलो या कमाल किरकोळ मूल्य- एमआरपीच्या वैधानिक दरानुसार युरिया पुरवठा केला जात आहे. ( यात, कडुलिंबाचे आवरण लावण्यासाठी खर्च आणि कर समाविष्ट नाही) युरिया शेतकऱ्यांच्या शेतात, पोचण्यापर्यंतची किंमत आणि, युरिया उत्पादकांनी निश्चित केलेली किंमत यातील तफावत, अनुदान स्वरूपात सरकारकडून दिली जाते. त्यामुळे, सर्व शेतकऱ्यांना अनुदानित दराने युरिया पुरवठा केला जातो.
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री मानसुख मांडवीय यांनी आज ;लोकसभेत ही माहिती दिली.