Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

नागरी सेवा परीक्षा, 2019 चा अंतिम निकाल

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर, 2019 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेच्या लेखी परीक्षेच्या निकालानुसार आणि 2019 च्या फेब्रुवारी-ऑगस्ट 2020 मध्ये  व्यक्तिमत्व चाचणीसाठी घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे, पुढील सेवांसाठी गुणवत्तेनुसार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे:-

i.  भारतीय प्रशासकीय सेवा;

ii. भारतीय विदेश सेवा;

iii. भारतीय पोलिस सेवा; आणि

iv. केंद्रीय सेवा, गट ’अ’ आणि गट ’ब’

2. खालील वर्गवारीनुसार एकूण 829 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली गेली आहे:

GENERAL EWS OBC SC ST TOTAL
304

(incl.

11PwBD-1, 05PwBD-2,

12 PwBD-3 &01PwBD-5)

78

(incl.

01 PwBD-1, Nil PwBD-2, Nil PwBD-3 & Nil PwBD-5)

251

(incl.

04PwBD-1,

03PwBD-2,

01 PwBD-3 &

02 PwBD-5)

129

(incl.

Nil PwBD-1, 01PwBD-2,

Nil PwBD-3&01PwBD-5)

67

(incl.

01 PwBD-1, Nil PwBD-2, Nil PwBD-3&NilPwBD-5)

829

(incl.

17PwBD-1, 09PwBD-2,

13 PwBD-3 &04PwBD-5)

 

3. नागरी सेवा परीक्षा नियम 2019 च्या नियम 16 (4) आणि (5) नुसार आयोग, उमेदवारांची एकत्रित राखीव यादी देत आहेः

GENERAL EWS OBC SC ST TOTAL
91 09 71 08 03 182

 

4. विविध सेवांमध्ये नियुक्ती परीक्षेच्या नियमात असलेल्या तरतुदींचा योग्य विचार करून उपलब्ध असलेल्या रिक्त जागांच्या संख्येनुसार नियुक्ती केली जाईल. शासनाने भरलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

SERVICES GEN EWS OBC SC ST Total
I.A.S. 72 18 52 25 13 180
I.F.S. 12 02 06 03 01 24
I.P.S. 60 15 42 23 10 150
Central Services Group ‘A’ 196 34 109 64 35 438
Group ‘B’ Services 57 14 42 14 08 135
Total 397 83 251 129 67 927*

 

* यात 45 पीडब्ल्यूबीडी रिक्त पदांचा समावेश आहे (17PwBD-1,09PwBD-2,13PwBD-3 आणि06PwBD-5)

5. खालील परीक्षा क्रमांक असलेल्या 66 शिफारस केलेल्या उमेदवारांची नियुक्ती ही अस्थायी आहे.

0117361 0832349 0881339 1527661 5605664 6312901 6623216
0221459 0841582 1014928 1704570 5802252 6403507 6624238
0311457 0846717 1018444 1800337 5903243 6418278 6626430
0322470 0850640 1025154 1803006 5904607 6421207 6626732
0335595 0864380 1043821 2606514 6303184 6611214 6702644
0339514 0867400 1200993 2611449 6306477 6612275 7905571
0800578 0869408 1204457 2611943 6307930 6612906  
0807978 0873750 1214669 3400814 6309407 6615096  
0814869 0876025 1219268 3535267 6312214 6617405  
0827666 0878636 1301406 4101930 6312812 6620627  

 

6. 11 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

7. नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल हा आधीच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये माननीय न्यायालयांद्वारे मंजूर केलेल्या आदेशाद्वारे आवश्यक असल्यास त्या बदलांच्या अधीन आहे.

8. यूपीएससीच्या आवारातील परीक्षा हॉलजवळ एक “सुविधा केंद्र” आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा / भरती संबंधी कोणतीही माहिती / स्पष्टीकरण कामाच्या दिवसात सकाळी 10:00 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रत्यक्ष किंवा 23385271 / 23381125 / 23098543 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून मिळवू शकतात. यूपीएससीच्या www.upsc.gov.in.या संकेतस्थळावर देखील निकाल उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांपर्यंत संकेतस्थळावर गुण पाहता येतील.

टीप: नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल मा. न्यायालयात प्रलंबित प्रकरणाच्या निकालानुसार बदलू शकतो.

अंतिम निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यशस्वींचा अभिमान, ते संधीचे सोने करतील – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ४ :- केंद्रीय लोकसेवा आय़ोगाच्या नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या राज्यातील उमेदवारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. या यशस्वींनी राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे, ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून ते या संधीचेही सोने करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, आपल्या यशाने मराठी झेंडा फडकविणाऱ्या यशस्वींचे मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या कष्टाने स्वप्नाला गवसणी घातलीच आहे. आता तुम्ही आपला समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळवली आहे, त्याचाही अभिमान आहे. या संधीचे तुम्ही निश्चित सोने कराल, असा विश्वास वाटतो. या वाटचालीत तुमच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या आई-वडील, पालक यांच्यासह गुरूजन, मार्गदर्शकांचेही अभिनंदन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Exit mobile version