केंद्रीय जल आयोग देशातील 123 प्रमुख जलाशयांतील पाणीसाठ्यावर देखरेख ठेवत असते. या सर्व जलाशयांपैकी, 43 जलाशयांची 60 मेगावॉट जलविद्युत निर्मितीची क्षमता आहे. या सर्व जलाशयांची एकत्रित जलसाठवण क्षमता 171.091 अब्ज घनमीटर इतकी आहे.
सध्या असलेल्या पाणीसाठ्यानुसार, या सर्व जलाशयांमध्ये 139.158 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 81 टक्के इतके आहे. गेल्या वर्षी हा पाणीसाठा 134.425 अब्ज घनमीटर इतका होता. सध्या देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत आणि गेल्या दहा वर्षातील सरासरी आकडेवारीच्या तुलनेत, यंदा उत्तम स्थिती आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यांमधील 8 जलाशयांमध्ये एकूण 19.17 अब्ज घनमीटर साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी जलसाठा उपलब्ध आहे.
झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओदिशा, आणि नागालँड या पूर्वेकडील राज्यातल्या 18 जलाशयांमध्ये 19.43 अब्ज घनमीटर साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत, या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण चांगले आहे.
पश्चिम भागात, महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये आहेत. या भागात 42जलाशये आहेत, ज्यांच्यात सध्या 30.60 अब्ज घनमीटर जलसाठा उपलब्ध असून एकूण क्षमतेच्या 87 टक्के इतका हा साठा आहे. गेल्या वर्षीच्या आणि गेल्या दहा वर्षातील सरासरी प्रमाणाच्या तुलनेत, जलसाठ्याचे प्रमाण चांगले आहे.
मध्य भारतात, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तिसगढ ही राज्ये असून त्यात 19 जलाशये आहेत. या सर्व जलाशयांमध्ये सध्या 38.12 अब्ज घनमीटर जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण चांगले आहे .
दक्षिण भागात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक,केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये 36 जलाशये आहेत ज्यांच्यात सध्या 41.64 अब्ज घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.