महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ नोंदविण्यात आली
जागतिक महामारीविरूद्धच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. देशात एकूण देण्यात आलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी 5 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तात्पुरत्या अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत , 8,23,046 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून लसीच्या 5,08,41,286 मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण मोहिमेच्या 67 व्या दिवशी (23 मार्च 2021),लसीच्या 23,46,692 मात्रा देण्यात आल्या.
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरात या पाच राज्यात कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात आली. एकूण रुग्णसंख्येपैकी 77.44% रुग्ण या राज्यातील आहेत.
गेल्या 24 तासात 47,262 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन 28,699 नवे रुग्ण आढळले .
भारतात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या आज 3,68,457 वर पोहोचली. ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 3.14% आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रिय रुग्णसंख्येत 23,080 इतक्या निव्वळ सक्रिय रुग्णांची नोंद झाली.
भारतात आज बरे झालेल्यांची एकूण संख्या 1,12,05,160 आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 95.49%. आहे.
गेल्या 24 तासात 23,907 रुग्ण उपचारानंतर बरे झाले.
गेल्या 24 तासात 275 मृत्यूंची नोंद झाली.
नवीन मृत्युसंख्येपैकी 83.27% मृत्यू सहा राज्यात नोंदविण्यात आले. महाराष्ट्रात सर्वाधिक (132) मृत्यूंची नोंद झाली.