Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात यंदा सरासरी इतका मोसमी पाऊस

देशात जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा मौसमी पाऊस साधारणतः दीर्घ कालावधीसाठी सरासरी पर्जन्यमानाच्या (LPA) 101 टक्के एवढा होईल, असा हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रानुसार देशात जून ते सप्टेंबर महिमान महिन्यांत दरम्यान पडणारा नैऋत्य मोसमी पाऊस हा सर्वसाधारण सरासरीएवढा म्हणजेच दीर्घ कालावधीसाठी सरासरी पर्जन्यमानाच्या  (LPA)  96 ते 104 टक्के होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे.

  1. नेमकेपणाने सांगायचे झाल्यास जून ते सप्टेंबर दरम्यान देशात पडणारा नैऋत्य मोसमी पाऊस हा यावर्षी पावसाच्या दीर्घकालीन सरासरीच्या 101% एवढा होईल.
  2. या अंदाजात 4 टक्के अधिक उणे. एवढी त्रुटी असू शकेल. 1961-2010 या मोठ्या कालखंडात देशातील नैऋत्य मोसमी पावसाची सरासरी 88 सेन्टी मीटर होती. देशातील चार एकसंध भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण असेल.
  3. वायव्य भारतात 92 ते 108 टक्के, दक्षिण द्वीपकल्पात 93 टक्के ते 107 टक्के. मोसमी पावसाचे ईशान्य भारतातील  प्रमाण सरासरीहून कमी म्हणजेच 95% हून कमी तर मध्य भारतात  सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 106 टक्केहून जास्त असेल असा अंदाज आहे.
  4. मुख्यत्वे मोसमी पावसावर अवलंबून असणाऱ्या आणि मोसमी पावसावर आधारित शेती असणाऱ्या भागात नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीहून जास्त म्हणजे सरासरीच्या 106 टक्के  होईल.
  5. मोसमी पाऊस सर्वसाधारणपणे सर्वदूर (आकृती 1) व्यवस्थित पडेल.  या मोसमात देशातील बहुतेक भागात सरासरीएवढा किंवा त्याहून जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे.
  6. आधुनिक जागतिक हवामान प्रतिकृतीनुसार केल्या जाणाऱ्या हवामान अंदाजावरून विषुववृत्तीय पॅसिफिक समुद्रात एल निनो तसेच दक्षिण दोलन परिस्थिती  आहे तशीच राहिल्याने हिंदी महासागरातील IOD म्हणजेच हिंदी महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान दोलनात नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.

 

Exit mobile version