ही यशकथा आहे. हिमाचल प्रदेशच्या शेतकऱ्यांची. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने आपल्या घरात धने, पुदिना, पेपरमिंट, पालेभाज्या, पालक, वाटाणे, फ्लॉवर, ब्रोकोली, कोबी, वांगी, टोमॅटो, काकडी पिकवल्याचे येथील शेतकरी विक्रम यांनी सांगितले.
राज्यातील घुमरविन उपविभागातील बाकरोआ ग्रामपंचायतीच्या मजसू गावातील प्रयोगशील शेतकरी शेतात नगदी पिके घेत आहेत. विक्रम चंदेल त्यांचे नाव. यांनी केवळ 20 हजार खर्च करून हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली आहे. हे तंत्र इतर शेतकऱ्यांना शिकवत आहे. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने आपल्या घरात धने, पुदिना, पेपरमिंट, पालेभाज्या, पालक, वाटाणे, फ्लॉवर, ब्रोकोली, कोबी, वांगी, टोमॅटो, काकडी पिकवल्याचे विक्रम यांनी सांगितले.
एका कंपनीच्या कामासाठी ते दुबई आणि आफ्रिकेत गेले होते, तिथे त्यांनी मातीविना शेती करण्याबद्दल ऐकले, मग ते जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. ही शेती त्यांनी जवळून समजून घेतली आणि आता ती यशस्वीपणे आपल्या घरात वापरली आहे. या तंत्रात उच्च दर्जाचे बियाणे वापरले जाते.
कृषी विभागाने सहकार्य केल्यास इतर शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देऊन प्रोत्साहन मिळू शकेल, असे विक्रम यांनी सांगितले. विक्रम चंदेल हे मार्केट आणि गावोगावी जाऊन पोस्टर्स वाटून या शेतीचा प्रचार करत आहेत. हे तंत्र शेतकऱ्याला जास्त मेहनत करण्यापासून वाचवते. खुरपणी, तण काढण्याप्रमाणेच इतरही कामे वाचतात असे ते सांगतात.