आजकाल प्रत्येकाला आरामदायी आणि भरपूर कमाईची नोकरी आवडते. पण कोणत्या पदांसाठी चांगला पगार मिळतो? त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? हे फार कमी लोकांना माहीत आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक पगार देणाऱ्या या नोकऱ्यांबद्दल..
१. चार्टर्ड अकाउंटंट (CA):
चार्टर्ड अकाउंटंटच्या पदाचा पगार खूप चांगला मानला जातो. या पदासाठी कुशल व्यावसायिकांना वार्षिक 5 लाख ते 25 लाख रुपये मिळू शकतात. CA होण्यासाठी, तुम्हाला CA च्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी 10+2 नंतर CA होता येते. ICAI द्वारे राष्ट्रीय स्तरावरील CA CPT नावाची परीक्षा आयोजित केली जाते.
२. पायलट:
पगाराच्या बाबतीत पायलट नोकरी ही भारतातील सर्वोत्तमपैकी एक आहे. या कामासाठी तुम्हाला दरमहा दीड लाख रुपये ते सहा लाख रुपये मिळू शकतात. पायलट होण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने किमान 50% गुणांसह 12 वी विज्ञान (PCM) उत्तीर्ण केलेली असावी. यानंतर विद्यार्थ्याला कोणत्याही संस्थेकडून पायलट परवान्यासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण, खासगी पायलटसाठी एक वर्षाचे प्रशिक्षण आणि व्यावसायिक पायलट परवान्यासाठी तीन वर्षांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. पायलट होण्यासाठी उमेदवाराने DGCA द्वारे मान्यताप्राप्त फ्लाइंग क्लबमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
३. डॉक्टर:
पगार किंवा कमाईच्या बाबतीत डॉक्टरांचा व्यवसाय देखील खूप चांगला मानला जातो. डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही महिन्याला 1.5 लाख रुपये ते 10 लाख रुपये कमवू शकता. डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता MBBS आहे ज्याबद्दल सर्वांना माहिती आहे. MBBS मध्ये १२वी सायन्स (PCB) चे विद्यार्थी NEET परीक्षेद्वारे प्रवेश घेऊ शकतात.
४. सनदी अधिकारी:
पगाराच्या दृष्टीने नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IAS/IPS अधिकारी बनणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. या पदासाठी दरमहा १ लाख ते २ लाख रुपये पगार आहे. पगारापेक्षा या पदाची ताकद महत्त्वाची आहे. पदवी उत्तीर्ण केलेली कोणतीही व्यक्ती नागरी सेवांसाठी तयारी करू शकते.
५. सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकर:
सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकरचा पगार लाखात नव्हे तर कोटींमध्ये असू शकतो. मात्र भारतात वार्षिक 5 लाख ते 30 लाख रुपये मिळू शकतात. सायबर सुरक्षेशी संबंधित कोर्स करण्यासाठी उमेदवाराने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. सायबर सुरक्षेचा कोर्स 2 महिने ते 2 वर्षांचा असतो.