राज्यातील ओबीसींना आरक्षणाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेत राजकीय आरक्षण देण्याच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका नकोत, या राज्य सरकारने मंजूर केलेल्या विधेयकावरही त्यांनी सही झाली असल्याची माहितीही पवार यांनी दिली.
जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नयेत आणि 50 टक्क्यांच्या मर्यादेत राहून ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात यावे, असे विधेयक महाविकास आघाडीने मंजूर करुन घेतले होते. हे विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आले होते व त्यावंतर अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. मात्र, राज्यपालांनी त्यवर आक्षेप घएत सही केली नव्हती.
आता त्या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्याने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.