Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतात बरे झालेल्यांची एकूण संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा 1 कोटीने जास्त

दैनंदिन मृत्यू संख्येतही घट,  सुमारे 8 महिन्यानंतर दैनंदिन मृत्युसंख्या 145

कोरोनाविरोधातल्या लढ्यात भारताने आज आणखी एक टप्पा गाठला असून बरे झालेल्यांची संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा एक कोटीहून  जास्त झाली आहे.

देशात बरे झालेल्यांची एकूण  संख्या 1,02,11,342  झाली  असून देशातल्या सक्रीय रुग्णांची संख्या आज 2,08,012 होती. यामधले अंतर 1,00,03,330 झाले आहे. देशातल्या एकूण बरे झालेल्यांची संख्या ही सक्रीय रुग्णांच्या सुमारे 50 पट आहे.

रुग्ण बरे होण्याचा भारताचा दर  96.59% झाला आहे.

गेल्या 24 तासात देशात 14,457 रुग्ण बरे झाले आणि 13,788 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात दैनंदिन पॉझिटिव्ह संख्येत सातत्याने घट होत असल्याने कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यू संख्येतही घट होत आहे. गेल्या 24 तासात देशात  145  मृत्यूंची नोंद झाली. सुमारे 8 महिन्यांनी  म्हणजे (7 महिने 23 दिवस ) 150 पेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली.

खालील आलेख गेल्या 24 तासातली  विविध राज्यातली  दैनंदिन मृत्यू संख्या दर्शवत आहे.

15 राज्यात एकही मृत्यू झालेला नाही.13 राज्यात 1 ते 5 दैनंदिन मृत्यू. 4 राज्यात 5 ते 10 मृत्यू,1 राज्यात 10 ते 20 मृत्यू आणि 20 राज्यात 2 मृत्यूंची नोंद दिसत आहे.

बरे झालेल्या पैकी 71.70%  हे 7  राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 4,408 जण कोरोनामुक्त झाले महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 2,342 तर  कर्नाटकमध्ये 855  जण बरे झाले.

नव्या रुग्णांपैकी 76.17% रुग्ण सहा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये  दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 5,005 नवे  रुग्ण आढळले, महाराष्ट्रात 3,081 आणि कर्नाटकमध्ये 745  नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासातल्या   मृत्यूंपैकी  83.45%   मृत्यू सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त 50  मृत्यूंची नोंद झाली. केरळमध्ये 21 आणि  पश्चिम बंगालमध्ये 12  दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.

 

Exit mobile version