गेल्या 24 तासांमध्ये देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 74,57,970 मात्रा देण्यात आल्या आहेत. आज सकाळी 7.00 वाजता प्राप्त झालेल्या अंतरिम अहवालामधील आकडेवारीनुसार भारतामध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने आता 131.18 कोटींचा टप्पा (1,31,18,87,257) ओलांडला आहे. देशभरामध्ये 1,36,76,290 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे.
आज सकाळी 7.00 वाजता प्राप्त झालेल्या अंतरिम अहवालातल्या आकडेवारीनुसार देशामध्ये देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रांची गटनिहाय विभागणी खाली देण्यात आली आहे.
HCWs |
1st Dose |
1,03,85,305 |
2nd Dose |
95,79,660 |
FLWs |
1st Dose |
1,83,82,457 |
2nd Dose |
1,66,55,975 |
Age Group 18-44 years |
1st Dose |
47,44,77,287 |
2nd Dose |
26,05,56,258 |
Age Group 45-59 years |
1st Dose |
18,85,95,812 |
2nd Dose |
13,07,50,298 |
Over 60 years |
1st Dose |
11,79,69,122 |
2nd Dose |
8,45,35,083 |
Total |
1,31,18,87,257 |
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 7,678 रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे देशात महामारीला प्रारंभ झाल्यापासून या आजारातून पूर्ण बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता 3,41,05,066 झाली आहे.
परिणामी, भारताचा रोगमुक्ती दर 98.36 टक्के झाला आहे. हा दर मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर आहे.
केंद्र सरकार आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारे यांनी केलेल्या शाश्वत आणि संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांमुळे दैनंदिन नोंद होत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 15,000 पेक्षाही कमी आहे. हा कल गेल्या सलग 43 दिवसांपासून कायम आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात 8,503 नव्या लोकांना कोविडची बाधा झाल्याची नोंद आहे.

भारतामध्ये सध्या कोविड सक्रिय रूग्णसंख्या 94,943. आत्तापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येच्या 0.27टक्के हे प्रमाण आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.
संपूर्ण देशामध्ये कोविड संसर्ग तपासणीच्या चाचण्या अधिक व्यापक करण्याचे काम सुरू आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये एकूण 12,93,412 चाचण्या करण्यात आल्या. आत्तापर्यंत देशामध्ये एकूण 65.32 कोटींपेक्षा जास्त (65,32,43,539) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरामध्ये कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता वाढविण्यात येत असतानाच, देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.72 टक्के आहे. गेल्या 26 दिवसांपासून हा दर एक टक्क्यांपेक्षाही कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.66 टक्के नोंदवला गेला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेल्या सलग 67 दिवसांपासून 2 टक्क्यांपेक्षा कमी आणि गेल्या सलग 102 दिवस 3 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला आहे.