Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो 97.28 %

गेल्या 24 तासात 41,806 दनंदिन नवीन रुग्णांची नोंद

देशातील कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 39 कोटींचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजता मिळालेल्या अहवालानुसार, 49,41,567 सत्रांच्या माध्यमातून आतापर्यंत  एकूण 39,13,40,491 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 34,97,058 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

कोविड – 19 प्रतिबंधक सार्वत्रिक लसीकरणाचा टप्पा 21 जून 2021 पासून सुरू झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

महामारीच्या प्रारंभापासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी आतापर्यंत  एकूण 3,01,43,850  रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 39,130 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 97.28 % असून याचा आलेख चढता आहे.

देशात गेल्या 24 तासात 41,806 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

सलग 18 दिवस 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वयातून झालेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशात आज उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,32,041 इतकी आहे आणि उपचाराधीन रुग्णसंख्या ही एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्येच्या 1.39 % इतकी आहे.

देशातील कोरोना चाचण्या करण्याच्या सातत्याने क्षमतेत वाढ होत असून गेल्या 24 तासात 19,43,488 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 43.80 कोटींपेक्षा अधिक  (43,80,11,958) चाचण्या करण्यात आल्या.

देशात चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आलेली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सातत्याने कमी होत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा 2.21 % असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.15 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा सलग 24 व्या दिवशी 3 % पेक्षा कमी आहे, तर सलग 38 व्या दिवशी तो 5 %  च्या खाली आला आहे.

Exit mobile version