रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.14%

गेल्या 24 तासात 1,72,433 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासात लसीच्या 55 लाखांहून अधिक (55,10,693) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 167.87 कोटी (1,67,87,93,137)  मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,85,37,996 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,96,612
2nd Dose 98,86,305
Precaution Dose 35,09,973
FLWs 1st Dose 1,83,98,615
2nd Dose 1,72,79,961
Precaution Dose 42,84,468
Age Group 15-18 years 1st Dose 4,77,79,454
2nd Dose 21,63,015
Age Group 18-44 years 1st Dose 54,28,10,477
2nd Dose 41,05,04,684
Age Group 45-59 years 1st Dose 20,06,20,676
2nd Dose 17,27,32,572
Over 60 years 1st Dose 12,51,18,558
2nd Dose 10,76,27,091
Precaution Dose 56,80,676
Precaution Dose 1,34,75,117
Total 1,67,87,93,137

गेल्या 24 तासात 2,59,107 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून) 3,97,70,414 झाली आहे.

परिणामी, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.14% इतका आहे.

गेल्या 24 तासात 1,72,433 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 15,33,921आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण   3.67% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 15,69,449 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 73.41 कोटींपेक्षा जास्त (73,41,92,614) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 12.98% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 10.99% नोंदविण्यात आला आहे.