देशात गेल्या 24 तासात कोरोना रुग्ण घटले

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 116.87 कोटीहून अधिक

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  32,99,337 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 116.87 कोटीपेक्षा जास्त  (1,16,87,28,385) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,20,77,324 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

HCWs 1st Dose 1,03,82,290
2nd Dose 94,07,092
 

FLWs

1st Dose 1,83,76,108
2nd Dose 1,63,19,085
 

Age Group 18-44 years

1st Dose 44,29,75,971
2nd Dose 19,15,97,004
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,08,59,227
2nd Dose 11,12,04,851
 

Over 60 years

1st Dose 11,32,78,631
2nd Dose 7,43,28,126
Total 1,16,87,28,385

 

 

गेल्या 24 तासात 12,510 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,39,34,547 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.31% झाला आहे.

सलग 148 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 8,488 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,18,443 आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.34% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 7,83,567 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 63.25 कोटीहून अधिक (63,25,24,259) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.93% असून गेले   59 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.08% असून गेले 49 दिवस 2% पेक्षा कमी आणि 84 दिवस 3% पेक्षा कमी आहे.