Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात सक्रीय कोरोना रुग्ण संख्या आज 2.83 लाख

गेल्या 11 दिवसापासून दैनंदिन रुग्ण संख्या सातत्याने 30 हजारापेक्षा कमी

भारतात सक्रीय रुग्ण संख्येत होणारी घट कायम आहे. देशात  आज एकूण 2,83,849 सक्रीय रुग्ण असल्याची नोंद झाली. एकूण पॉझीटीव्ह रुग्णात, सक्रीय रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होऊन ते 2.80%. झाले आहे.

गेल्या 24 तासात एकूण सक्रीय रुग्णात 5,391  ची घट झाली.

सुमारे महिनाभरापासून (27 days) दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या, दैनंदिन रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे. गेल्या 24 तासात 24,712 जण पॉझिटीव्ह आढळले तर  याच काळात 29,791 जण कोरोनातून बरे झाले. यामुळे सक्रीय रुग्ण संख्येत घट राहिली.

भारतात गेल्या 11 दिवसापासून दैनंदिन रुग्ण संख्या सातत्याने 30 हजारापेक्षा कमी नोंदवली गेली आहे.

एकूण बरे झालेल्यांची संख्या 97 लाख  (96,93,173) झाली असून बरे होण्याच्या दरात वाढ होऊन तो 95.75%.झाला आहे.

बरे झालेल्यांपैकी 79.56% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 7,620 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून  गेल्या 24 तासात केरळ मध्ये 4,808 आणि पश्चिम बंगाल मध्ये 2,153 जण बरे झाले.

नव्या रुग्णांपैकी 76.48% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 6,169 कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 3,913 आणि पश्चिम बंगाल 1,628 मध्ये रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 312 मृत्यूंची नोंद झाली.

या पैकी सुमारे 79.81% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन 93 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये 34 आणि केरळ मध्ये 22 मृत्यूंची नोंद झाली.

भारतात  दैनंदिन मृत्यू संख्येत घट होत असून गेले 12 दिवस दैनंदिन  मृत्यू संख्या 400 पेक्षा कमी राहिली आहे.

Exit mobile version