Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कार्तिक पौर्णिमेला शतकातील सर्वात मोठे चंद्रगहण

उद्या दिनांक 1 9 नोव्हेंबर रोजी या वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण होत आहे. हे चंद्र ग्रहण अनेक प्रकारे महत्वाचे मानले जात आहे. कार्तिक मासातील पौर्णिमेला होत असलेल्या या चंद्र ग्रहणाच्या दिवशीच कार्तिक मासाची समाप्ती आहे. या चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये आणि ज्योतिषांच्या दृष्टीकोनातून त्याचा काय प्रभाव पडेल हे आपण पाहणार आहोत.

शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण
हे खूप विशेष असणारआहे . कारण 580 वर्षांनंतर अशा पद्धतीचे चंद्र ग्रहण दिसणार आहे. हे शतकातील सर्वात मोठे चंद्र ग्रहण मानले जाते. हा चंद्र ग्रहण गेल्या 580 वर्षांपासून सर्वात दीर्घ असे खंडग्रास चंद्रगहण असेल. चंद्र ग्रहणाचा कालावधी सुमारे साडेतीन तास राहील. भारतात, हे चंद्र ग्रहण दुपारी 12:48 पासून 04:17 पर्यंत असणार आहे.

ज्योतिषांच्या नजरेतून चंद्रग्रहण

उद्या होणारे चंद्रग्रहण हे खंडग्रास असल्याने त्याचे वेध पाळू नयेत असे ज्योतिषी सांगत आहेत. कारण हे केवळ अंशत: किंवा उपछाया ग्रहण आहे, खग्रास किंवा पूर्ण चंद्राला ग्रहण असेल, तरच चंद्रग्रहण पाळावे. या वर्षी वृषभ राशीत हे चंद्रग्रहण होत असल्याने सर्वाधिक प्रभाव हा वृषभ राशींच्या लोकांवर होणार आहे. याशिवाय ज्योतिषांनुसार कृतिका नक्षत्रात हे चंद्रग्रहण होत आहे. हे सूर्याच नक्षत्र समजले जाते. त्यामुळे ज्या लोकांचा जन्म कृतिका नक्षत्रात झाला, त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version