Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायम

कोविड संदर्भात अद्ययावत माहिती

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 24 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा प्रदान

देशभरातील लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींच्या  विनामूल्य मात्रा उपलब्ध करीत सहकार्य करत आहे. याव्यतिरिक्त, राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या मात्रांची  थेट खरेदी सुलभ करण्यासाठी केंद्रे सरकार पूरक भूमिका बजावत   आहे. लसीकरण हा चाचणी, मागोवा, उपचार आणि कोविड-19 योग्य वर्तनासह, या महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या केंद्र  सरकारच्या सर्वसमावेशक रणनीतीचा अविभाज्य स्तंभ आहे.

कोविड -19 लसीकरणाच्या व्यापक आणि गतीमान तिसऱ्या टप्प्याच्या  रणनीतीच्या अंमलबजावणीला दिनांक1 मे 2021 पासून प्रारंभ झाला आहे.

या धोरणानुसार, प्रत्येक महिन्यात केंद्रीय औषधी प्रयोगशाळेने‌ मान्यता दिलेल्या (सीडीएल) कोणत्याही उत्पादकाच्या लसींच्या एकूण मात्रांपैकी 50% डोस केंद्र सरकारकडून खरेदी केले जातील आणि केंद्र सरकार पूर्वीप्रमाणे या लसींच्या मात्रा  राज्य सरकारांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करुन देत आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य आणि थेट राज्य खरेदी या दोन्ही प्रकारांत 24 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा (24,21,29,250) दिल्या आहेत.

Exit mobile version