सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायम

कोविड संदर्भात अद्ययावत माहिती

  • सक्रिय रुग्णसंख्या घसरणीचा उतरता कल कायम, देशातील सक्रिय रुग्णसंख्या घटून 16,35,993; गेल्या सलग 8 दिवसांपासून 2 लाखांच्या खाली
  • गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 77,420  रुग्णांची घट
  • देशात गेल्या 24 तासात  दैनंदिन 1.32 नवीन रुग्णांची नोंद , दैनंदिन नवीन रुग्णसंख्येचा घसरणीचा कल कायम
  • देशभरात आतापर्यंत, 2.65 पेक्षा जास्त रुग्ण कोविड मधून बरे झाले.
  • गेल्या 24 तासात 2,07,071 रुग्ण कोविडमुक्त  झाले.
  • सलग 22 व्या दिवशी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक
  • वाढीचा आलेख कायम ठेवत, रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 93.08% वर
  • साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या 7.27%
  • दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 6.38%, सलग 11 व्या दिवशी हा दर 10% च्या खाली राहिला
  • कोविड चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ – आतापर्यंत एकूण 35.7 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
  • देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, लसीच्या
  • 22.41 कोटी मात्रा देण्यात आल्या.

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 24 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा प्रदान

देशभरातील लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींच्या  विनामूल्य मात्रा उपलब्ध करीत सहकार्य करत आहे. याव्यतिरिक्त, राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या मात्रांची  थेट खरेदी सुलभ करण्यासाठी केंद्रे सरकार पूरक भूमिका बजावत   आहे. लसीकरण हा चाचणी, मागोवा, उपचार आणि कोविड-19 योग्य वर्तनासह, या महामारीच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या केंद्र  सरकारच्या सर्वसमावेशक रणनीतीचा अविभाज्य स्तंभ आहे.

कोविड -19 लसीकरणाच्या व्यापक आणि गतीमान तिसऱ्या टप्प्याच्या  रणनीतीच्या अंमलबजावणीला दिनांक1 मे 2021 पासून प्रारंभ झाला आहे.

या धोरणानुसार, प्रत्येक महिन्यात केंद्रीय औषधी प्रयोगशाळेने‌ मान्यता दिलेल्या (सीडीएल) कोणत्याही उत्पादकाच्या लसींच्या एकूण मात्रांपैकी 50% डोस केंद्र सरकारकडून खरेदी केले जातील आणि केंद्र सरकार पूर्वीप्रमाणे या लसींच्या मात्रा  राज्य सरकारांना पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करुन देत आहे.

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य आणि थेट राज्य खरेदी या दोन्ही प्रकारांत 24 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा (24,21,29,250) दिल्या आहेत.