भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.40%
भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 29,93,283 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 141.70 कोटीपेक्षा जास्त (1,41,70,25,654) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,50,57,142 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये यांचा समावेश आहे-
HCWs | 1st Dose | 1,03,86,924 |
2nd Dose | 96,81,544 | |
FLWs |
1st Dose | 1,83,84,851 |
2nd Dose | 1,68,36,793 | |
Age Group 18-44 years |
1st Dose | 49,38,39,924 |
2nd Dose | 31,53,00,398 | |
Age Group 45-59 years |
1st Dose | 19,32,20,452 |
2nd Dose | 14,59,77,986 | |
Over 60 years |
1st Dose | 12,06,64,399 |
2nd Dose | 9,27,32,383 | |
Total | 1,41,70,25,654 |
गेल्या 24 तासात 7,141 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,42,37,495
रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% झाला आहे.
सलग 60 दिवसांपासून 15,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
गेल्या 24 तासात 6,531 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 75,841 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.22% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.
देशभरात चाचण्या क्षमता व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 7,52,935 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 67.29 कोटीहून अधिक (67,29,36,621 ) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.63% असून गेले 43 दिवस 1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.87% असून गेले 84 दिवस 2% पेक्षा कमी आणि 119 दिवस 3% पेक्षा कमी आहे.