भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94.91%

देशात समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत 167 कोटी 29 लाखांहून अधिक मात्रांचा टप्पा पार

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,61,386 नवे रुग्ण

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 16,21,603

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 14.15%

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 57 लाखाहून अधिक (57,42,659) मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 167 कोटी 29 लाखांहून अधिक (1,67,29,42,707) मात्रा दिल्या आहेत.

एकूण 1,83,99,537 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.सकाळी 7वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण मात्रांची विभागणी पुढील सारणीनुसार :

 

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,96,256
2nd Dose 98,79,519
Precaution Dose 34,51,621
FLWs 1st Dose 1,83,97,726
2nd Dose 1,72,64,513
Precaution Dose 41,40,422
Age Group 15-18 years 1st Dose 4,72,32,018
2nd Dose 11,28,099
Age Group 18-44 years 1st Dose 54,20,71,418
2nd Dose 40,84,76,861
Age Group 45-59 years 1st Dose 20,04,86,479
2nd Dose 17,22,41,222
Over 60 years 1st Dose 12,50,26,535
2nd Dose 10,73,23,731
Precaution Dose 54,26,287
Precaution Dose 1,30,18,330
Total 1,67,29,42,707

 

गेल्या 24 तासात 2,81,109 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे असून (महामारीच्या सुरवातीपासून) लागण झालेल्यांपैकी एकूण 3,95,11,307 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

परिणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर  94.91% झाला आहे.

गेल्या 24 तासात 1,61,386 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 16,21,603 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 3.90% इतके आहेत.

देशभरात कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 17,42,793 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत  73.24 कोटीहून अधिक (73,24,39,986) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 14.15% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर  9.26% आहे.