भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 94,742

गेल्या 24 तासांत देशात 9,419 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 80,86,910 मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 130 कोटी 39 लाखांचा (1,30,39,32,286) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,35,89,181 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

HCWs 1st Dose 1,03,85,160
2nd Dose 95,71,919
 

FLWs

1st Dose 1,83,82,231
2nd Dose 1,66,40,653
 

Age Group 18-44 years

1st Dose 47,27,96,104
2nd Dose 25,66,38,645
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,81,92,929
2nd Dose 12,96,48,490
 

Over 60 years

1st Dose 11,77,32,931
2nd Dose 8,39,43,224
Total 1,30,39,32,286

गेल्या 24 तासांत 8,251 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,40,97,388 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 98.36% झाला असून हा मार्च 2020 पासूनचा उच्चांकी दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 15,000 हून कमी असण्याचा कल आता गेले सलग 42 दिवस कायम आहे.

गेल्या 24 तासांत, 9,419 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 94,742 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.27% असून मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,89,983 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 65 कोटी 19 लाखांहून अधिक (65,19,50,127) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.74% असून गेले 25 दिवस हा दर 1%हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 0.73इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 66 दिवस 2% हून कमी आणि गेले सलग 101 दिवस 3% हून कमी राहिला आहे.