Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशातील रोगमुक्ती दर सध्या 96.36%

गेल्या 24 तासांत देशात 1,68,063 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, लसींच्या 92 लाखांहून अधिक  (92,07,700) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 152 कोटी 89 लाखांचा (1,52,89,70,294) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात  1,63,81,175 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे-:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,89,162
2nd Dose 97,49,504
Precaution Dose 5,19,604
FLWs 1st Dose 1,83,87,535
2nd Dose 1,69,87,318
Precaution Dose 2,01,205
Age Group 15-18 years 1st Dose 2,62,35,531
Age Group 18-44 years 1st Dose 51,64,88,421
2nd Dose 35,52,58,150
Age Group 45-59 years 1st Dose 19,64,00,931
2nd Dose 15,70,66,390
Over 60 years 1st Dose 12,24,27,789
2nd Dose 9,85,94,887
Precaution Dose 2,63,867
Precaution Dose 9,84,676
Total 1,52,89,70,294

 

गेल्या 24 तासात 69,959 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. त्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,45,70,131 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 96.36% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, 1,68,063 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रिय (उपचाराधीन) रुग्णसंख्या सध्या  8,21,446 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रिय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 2.29% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 15,79,928 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 31 लाखांहून अधिक (69,31,55,280) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 8.85% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 10.64% इतका आहे.

Exit mobile version